Wed, May 22, 2019 23:11होमपेज › Sangli › आघाडीच्या भ्रष्टाचाराला जनतेने चपराक दिली : सुभाष देशमुख 

आघाडीच्या भ्रष्टाचाराला जनतेने चपराक दिली : सुभाष देशमुख 

Published On: Aug 04 2018 1:36AM | Last Updated: Aug 03 2018 11:20PMसांगली : प्रतिनिधी

सांगली महापालिका निवडणुकीत भाजपचा विजय हा काँग्रेस, राष्ट्रवादीने गेल्या 15 वर्षांत केलेल्या भ्रष्टाचाराला चपराक आहे. जनतेने दाखविलेला हा विश्‍वास सार्थ करून दाखवू, अशी ग्वाही पालकमंत्री, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. 

ते म्हणाले, सांगली महापालिकेत राष्ट्रवादी व काँग्रेसची अनेक वर्षे सत्ता होती. सत्ता असताना या दोन्ही पक्षांनी जनतेला अपेक्षित विकास करू शकले नाहीत. केवळ घोटाळे करून जनतेला वेठीस धरले. जनतेवर अन्याय, अत्याचार केला. यांच्या कारभाराला जनता पुरती कंटाळून गेली होती. अशी सत्ता अबाधित ठेवण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही  पक्षांवर  एकत्र येण्याची नामुष्की आली होती. याला जनतेने जागा दाखविली आहे.

ते पुढे म्हणाले, पंढरपूर येथे महापुजेला व सांगलीत प्रचार सभेला न येण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय समाजहिताचा होता. पण ही भावना आघाडीच्या नेत्यांनी समजून घेतली नाही.