Tue, Feb 19, 2019 15:09होमपेज › Sangli › विद्यार्थी आरोग्य तपासणी आराखडा करा

विद्यार्थी आरोग्य तपासणी आराखडा करा

Published On: Jan 16 2018 2:16AM | Last Updated: Jan 16 2018 12:04AM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

येथे रविवारी झालेल्या सद्भावना एकता रॅलीतून घरी परतत असताना   ऐश्‍वर्या शशिकांत कांबळे या शाळकरी मुलीच्या दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणाची दखल जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी गांभीर्याने घेतली आहे. अशा घटना भविष्यात होऊ नयेत, यासाठी त्यांनी आज अधिकार्‍यांची तातडीने बैठक घेतली. त्यात त्यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसंदर्भात आठ दिवसांत आराखडा तयार करण्याचे आदेश दिले. 

ऐश्‍वर्या ही आधीपासून आजारी होती. पालकांनी तिला खासगी डॉक्टरांकडे तपासण्यासाठी घेऊन गेल्यानंतर काही वैद्यकीय तपासण्या करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. तरीसुद्धा ती रॅलीत सहभागी झाली. शाळेतील शिक्षकांना ऐश्‍वर्याच्या आजाराबाबत फारशी माहिती नव्हती.  

आज जिल्हाधिकारी पाटील यांनी अशा घटना भविष्यात होऊ नयेत यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्यासह अधिकार्‍यांची बैठक घेतली. त्यात विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यात आरोग्याबाबत जनजागृती व्हावी, यासाठी काय करता येईल, याबाबत चर्चा करण्यात आली. शाळेत विद्यार्थ्यांचे हेल्थ कार्ड, शाळेपासून जवळ असलेल्या आरोग्य केंद्राचे आणि तेथील डॉक्टरांचे संपर्क क्रमांक ठेवणे, असे काही उपाय पुढे आले.