Sat, Apr 20, 2019 16:29होमपेज › Sangli › योग्य दिशेला गती दिल्यास हमखास यश(व्हिडिओ) 

योग्य दिशेला गती दिल्यास हमखास यश(व्हिडिओ) 

Published On: Jun 02 2018 2:04AM | Last Updated: Jun 02 2018 2:27AMसांगली : प्रतिनिधी

तुमची क्षमता आणि कल पाहून कोणत्या क्षेत्रात जायचे याचा निर्णय घ्या. त्यानुसार ध्येय  ठरवा. त्या ध्येयाच्या  दिशेला योग्य गती दिल्यास तुम्हाला हमखास यश मिळेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विजयकुमार काळम- पाटील यांनी शुक्रवारी येथे केले. 

संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रस्तुत ‘पुढारी - एज्यु-दिशा 2018’ पॉवर्ड बाय पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, पुणे या शैक्षणिक प्रदर्शनाचे जिल्हाधिकारी पाटील यांच्या हस्ते  उद्घाटन झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते.  संजय घोडावत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. ए. रायकर, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे प्रा. विजय नवले, विश्‍वकर्मा विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. सुनिल डोके, चाटे शिक्षण समुहाच्या कोल्हापूर विभागाचे सीईओ प्रा. एस. जे. पाटील, सूर्यदत्ता ग्रूपऑफ इन्स्टिट्युटच्या प्रा. रेणुका घोसपूरकर, संजय दळवी, मराठवाडा मित्र मंडळाचे प्रा. सुनिल काळे,  दै. पुढारीचे सहाय्यक  सरव्यवस्थापक राजेंद्र मांडवकर,  दै. पुढारीच्या सांगली आवृत्तीचे वृत्तसंपादक चिंतामणी सहस्त्रबुद्धे, दै. पुढारी इव्हेंट मॅनेंजर राहुल शिंगणापूरकर, सहाय्यक शाखा व्यवस्थापक युवराज पानारी, जाहिरात व्यवस्थापक अविनाश दीक्षित, माजी महापौर डॉ. नितीन सावगावे आदी उपस्थित होते.  

येथील कच्छी जैन सेवा समाज भवनमध्ये रविवारपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.  जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, आपले जीवन कसे बनवायचे, हे आपल्या हातात आहे. जगात करिअरच्या असंख्य वाटा आहेत. शासनाच्या विविध योजना आहेत. त्यातून योग्य तो मार्ग निवडा. सध्याचे युग हे स्पर्धेचे असले तरी गुणवत्तेचे आहे. गुणवत्तेच्या लोकांना आजही खूप मोठी मागणी आहे. 
ते म्हणाले, जगाच्या स्पर्धेत ठिकायचे असेल तर श्रमाला पर्याय नाही. बुद्धीमत्ता, श्रम आणि कल्पना या खूप महत्वाच्या बाबी आहेत. काही वेळा बुद्घीमत्तेपेक्षा शहाणपणा महत्वाचा ठरतो. बुद्धीवान असून ती व्यक्ती कोणतीही परिस्थिती योग्यपणे हाताळू शकत नसले तर त्या बुद्धीचा उपयोग शून्य आहे.  बुद्धीबरोबर दृष्टीकोनसुद्धा महत्वाचा आहे. आयुष्यात प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. भावनेपेक्षा कर्तव्याला महत्व द्या. कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही. स्पर्धेत अनेकजण उतरतात मात्र मनापासून तयारी करणारे खूप कमी आहेत.

कुलगुरु रायकर म्हणाले, केवळ विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातच संधी आहेत, असे नाही. त्या शिवायही विविध क्षेत्रात संधी आहेत. त्यातून आपणाला कोणत्या क्षेत्रात आवड आहे. त्याला किती स्कोप आहे, याचा विचार करून मार्ग निवडा. केवळ पुस्तकी ज्ञानापेक्षा जगात सध्या काय सुरू आहे. कोणत्या क्षेत्रात संधी आहेत. भविष्यात काय स्थिती असेल, याचाही विचार करा. कोणताही मार्ग निवडताना आपली आवड, क्षमता याचाही विचार करावा. 

एज्युदिशा पॉवर्ड बाय पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट व नुतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ ( पुणे), सहयोगी प्रायोजक विश्‍वकर्मा विद्यापीठ, सहप्रायोजक चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशन, मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनियरिंग ( पुणे )व सूर्यदत्ता ग्रुप ऑॅफ इन्स्टिट्यूट (पुणे) हे आहेत.

सांगली महापालिकेला सल्ला देण्याची तयारी
जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, सोलापूर महापालिकेत आयुक्त म्हणून काम करीत असतानाच सोलापूर शहराचा देशातील स्मार्टसिटीमध्ये समावेश करण्यात आला. सांगलीतील मंडळी मात्र आपसातच भांडत बसलेली आहेत. त्यांनी थोडा सोलापूरकरांचा बोध घ्यावा. त्यासाठी माझा त्यांना सल्ला देण्याची तयारी आहे.