Mon, May 20, 2019 10:19होमपेज › Sangli › जतमध्ये कोम्बिंग ऑपरेशन

जतमध्ये कोम्बिंग ऑपरेशन

Published On: Aug 27 2018 1:17AM | Last Updated: Aug 27 2018 12:15AMजत : प्रतिनिधी

जत पोलिसांनी मागील दहा वर्षांतील सर्वात मोठे कोम्बिंग ऑपरेशन केले. स्फोटकांचा साठा,  दरोड्यासाठीचे साहित्य, सहा चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या.  सहा संशयितांना ताब्यात घेतले. 2 पोलिस निरीक्षक, 5 सहायक पोलिस निरीक्षक, 2 दंगल नियत्रंण पथकासह सुमारे 150 पोलिसांनी कारवाईत सहभाग घेतला. 

उमराणी रोड पारधी तांडा व शहरातील पारधी तांडा या दोन्ही ठिकाणी रविवारी पहाटे तीनच्या सुमारास पोलिस निरीक्षक राजू ताशीलदार यांनी पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली. अचानक  झालेल्या या प्रकाराने पहाटे मोठा पारधीतांड्यात खळबळ माजली.

पोलिस आल्याची कुणकुण लागल्याने काहीजण पसार झाले. तालुक्यात 10 वर्षानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात कोबिंग ऑपरेशन करण्यात आले. सहा दुचाकी,   6 जिलेटीन कांड्या, गॅस कटर, गॅस शेगडी, 3 कटावण्या, लोखंडी पाईप, वायर, लोखंडी पाने, 2 लोखंडी प्लग पाने, 2 फ्रेम, एक्सा ब्लेड,  फेशर बेल्ड, 8 कटरचे ब्लेड, नायलान दोरी, 2 रेग्यूलटर, 2 पाईप कटिंग करण्याचे गँस कटर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

घरफोडी सारख्या गंभीर गुन्हातील संशयित शिवाजी प्रल्हाद चव्हाण (वय 23), संतोष प्रल्हाद चव्हाण (वय 22) यांच्यासह अन्य चार रेकार्डवरील गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जिल्हाभर सुरू असलेल्या चोरीसत्राच्या पाश्वभूमिवर पोलिस अधिक्षक सुहैल शर्मा, अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्या आदेशावरून पोलिस निरीक्षक राजू ताशीलदार, प्रकाश गायकवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान शिंदे, आप्पासाहेब कत्ते, सचिन गडवे, श्री. व्हसमळे सह 150 पोलिसांनी कारवाईत सहभाग घेतला. 

तालुक्यातील रेकार्डवरील गुन्हेगारांना पकडण्यासाठी ही मोहिम राबविण्यात आली. यात तांड्यावरील सर्व घरांची झडती घेण्यात आली.  जिल्हाभर धुडघूस घालत असलेल्या दुचाकी चोरी, घरफोडीच्या मोठ्या घटना घडल्या आहेत. त्या अनुषंगाने रेकार्डवरील गुन्हेगार असणार्‍या तांड्यावरील घरे तपासण्यात आली. सहा संशियतांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून अनेक घरफोड्या, दुचाकी चोर्‍या उघडकीस येण्याची शक्यता आहे.