Fri, May 24, 2019 09:16होमपेज › Sangli › ‘को-जनरेशन’च्या विजेला दराचा ‘शॉक’

‘को-जनरेशन’च्या विजेला दराचा ‘शॉक’

Published On: Jan 16 2018 2:16AM | Last Updated: Jan 15 2018 8:35PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांसाठी हमखास उत्पन्नाचे साधन ठरलेल्या सह-वीजनिर्मिती प्रकल्पांतील विजेला दरातील ‘ग्रहण’ लागले आहे. त तयार होणारी वीज खरेदीच्या दरात अस्थिरता आहे. त्याचा साखर उद्योगाला प्रतियुनिट विजेमागे मोठा फटका बसू लागला आहे. दरम्यान, कर्नाटकच्या धर्तीवर सह-वीजनिर्मिती प्रकल्पातील  वीज खरेदी दरात  वाढ करण्याची कारखानदारांची मागणी शासनदरबारी प्रलंबित राहिली आहे.   

तत्कालीन आघाडी सरकारच्या काळात भारनियमनाची तीव्रता कमी करण्यासाठी पुरेशा विजेचे उत्पादन व्हावे यासाठी   सरकारने अनेक साखर कारखान्यांना को-जनरेशन अर्थात सहवीजनिर्मिती प्रकल्पांची उभारणी करण्यासाठी मोठ्या पॅकेजची घोषणा केली होती.  तर यातून बहुसंख्य साखर कारखान्यांनी सहवीजनिर्मिती प्रकल्पांना  प्र्राधान्य दिले आहे.  यात तयार होणार्‍या विजेसाठी महावितरण हक्काचे ग्राहक असल्याने  विजेच्या पैशातून मिळणार्‍या उत्पन्नामुळे उसाला जादा दर  देणे शक्य होत असल्याचा विचार करुन   साखर कारखान्यांनी महागड्या दराने कर्ज काढू सहवीजनिर्मिती प्रकल्पांची उभारणी केली आहे. 

दरम्यान, दोन वर्षांपासून मात्र   सहवीजनिर्मिती प्रकल्पांमध्ये तयार होणार्‍या विजेचा खरेदी दर वाढवून मिळावा यासाठीचा प्रस्ताव सरकारकडे प्रलंबित राहिला आहे.   संबंधित साखर कारखान्याची विजेची गरज भागून शिल्लक राहणारी वीज वीजवितरण खरेदी करते, यासाठी प्रतियुनिट विजेचा खरेदी दर राज्य सरकार निश्‍चित करते, अशी पूर्वीपासूनची पद्धत आहे. तीन वर्षांपूर्वीपयर्ंत साडे-चार रुपये पाच पैसे दराने वीजवितरण प्रतियुनिट विजेची खरेदी करत होते.  आता हा दर सहा रुपये सत्तर पैसे या घरात आहे.  हा खरेदी दर वाढून मिळावा, अशी  साखर कारखानदारांची मागणी आहे.  कर्नाटक वीज मंडळ ज्या दराने सहवीजनिर्मिती प्रकल्पांमध्ये तयार होणारी वीज (प्रतियुनिट सात रुपये पंचवीस पैशाने) खरेदी करते, त्याकडे यानिमित्ताने बोट दाखविण्यात येते.  कर्नाटकमधील दराप्रमाणे वीजवितरणकडून विजेची खरेदी व्हावी, अशी साखर कारखानदारांची मागणी आहे. यासाठी सहवीजनिर्मिती प्रकल्पांची उभारणीचा खर्च तसेच सहवीजनिर्मितीसाठी लागणार्‍या कच्च्या मालाच्या वाढलेल्या किंमतीचे कारण दाखविले जात आहे. 

सहवीजनिर्मिती प्रकल्पात तयार होणार्‍या विजेचा खरेदी दर वाढून मिळाल्यास त्याचा अंतिमत: ऊस उत्पादकालाच ऊस दर वाढून मिळणार आहे.  हा मुद्दा देखील पुढे आणला जातो आहे.   मात्र दरवाढीची मागणी सरकार गांभीर्याने विचारात घेत नसल्याचा कारखानदारांमधून आरोप होत आहे.