Mon, Mar 25, 2019 09:10होमपेज › Sangli › स्वच्छ सर्वेक्षण साठी पथकाकडून ऑडिट

स्वच्छ सर्वेक्षण साठी पथकाकडून ऑडिट

Published On: Feb 23 2018 1:18AM | Last Updated: Feb 23 2018 12:15AMसांगली  ;  प्रतिनिधी

स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेअतंर्गत  मूल्यांकनासाठी गुरुवारी केंद्र सरकारच्या  समितीचे तीन सदस्यीय पथक सांगलीत दाखल झाले. त्यांनी स्वच्छता, घनकचरा, सुलभ शौचालय,वैयक्‍तिक शौचालय योजनेसह  महापालिका राबवत असलेल्या विविध प्रकल्पाच्या कागदपत्रांचे ऑडिटच सुरू केले. यासाठी येथील आरसीएच सेंटर बनले आहे. दोन दिवस हे पथक कागदपत्रांची तपासणी करणार असल्याचे आयुक्‍त रवींद्र खेबुडकर यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत देशात 50 शहरांच्या यादीत येण्यासाठी सांगली मिरज कुपवाड महापालिका उतरली आहे. शहरात स्वच्छता, कचरा उठाव, औषध फवारणी, यासह अनेक उपाययोजना पहाटेपासून सुरू आहेत. याअंतर्गत राज्य शासनाच्या पथकाने पाहणी केली होती. आता केंद्राच्या समितीचे प्रमुख कुमार जाधव, सदस्य जमीर लांडगे, रणलेक फासे हे गुरुवारी सकाळी सांगलीत दाखल झाले. केंद्र शासनाने नियुक्‍त केलेल्या एजन्सीची ही टीम आहे.

त्यांनी खेबूडकर उपायुक्‍त सुनील पवार, उपायुक्‍त स्मृती पाटील, आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे, डॉ.रवींद्र ताटे यांच्यासह सर्व विभागाचे खातेप्रमुख, प्रमुख अधिकारी यांच्याकडून महापालिका स्वच्छ सर्वेक्षण अतंर्गत राबवत असलेल्या प्रकल्पाच्या कागदपत्रांची तपासणी सुरू केली.  ड्रेनेज, पाणी पुरवठा योजना, सुलभ शौचालय, वैयक्‍तिक शौचालय योजना, घनकचरा प्रकल्पातंर्गत खत प्रकल्प, प्लास्टिक निर्मूलन अंतर्गत कापडी पिशव्या तयार करणे, याच बरोबर लोकसहभागातून राबविलेल्या योजनांचे प्रस्ताव , यातील कागदपत्रांची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे.

पुन्हा संध्याकाळी  खेबुडकर यांनी यासंदर्भात प्रमुख अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली. हे पथक  कागदपत्रे तपासून ती केंद्राकडे अपलोड करीत आहेत. दोन दिवसांच्या ऑडिटनंतर हे पथक शनिवारी, रविवारी तीनही शहरातील विविध उपक्रमांची पाहणी करून मूल्यांकन करणार आहे. ज्या ठिकाणी हे पथक स्पॉट व्हिजीटसाठी जाणार आहेती ठिकाणी केंद्राकडून ते ऐनवेळी कळविण्यात येणार आहेत. एकूणच अंतिम मूल्यांकनात देशात पहिल्या 50 मध्ये बाजी मारण्यासाठी महापालिकेची यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्नशील आहे. त्यातून 20 कोटी रुपयांच्या अनुदानरूपी विकासकामाचे बक्षीस मिळणार आहे.