Wed, Jul 17, 2019 18:04होमपेज › Sangli › वाळेखिंडीत बालकाचा सर्पदंशाने मृत्यू; वडिलांची प्रकृती गंभीर

वाळेखिंडीत बालकाचा सर्पदंशाने मृत्यू; वडिलांची प्रकृती गंभीर

Published On: Apr 11 2018 1:33AM | Last Updated: Apr 11 2018 12:16AMमिरज : शहर प्रतिनिधी

जत तालुक्यातील वाळेखिंडी येथील राजेंद्र जाधव (वय 45)  आणि त्यांचा मुलगा समर्थ (वय 9) या दोघांना नागाने दंश केला. त्यामुळे समर्थ याचा मिरजेत उपचारादरम्यान मृत्यू झाला.  राजेंद्र यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. मंगळवारी पहाटे ही घटना घडली. 

राजेंद्र जाधव शेतकरी आहेत. ते वाळेखिंडी येथील त्यांच्या शेतात पत्नी, मुलगी, मुलगा यांच्यासमवेत राहतात. सोमवारी रात्री ते झोपले होते. आज पहाटे राजेंद्र व त्यांचा मुलगा समर्थ या दोघांना नागाने दंश केला. ते लक्षात आल्यानंतर त्यांना जत येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर दुपारी त्यांना मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुपारीच समर्थ याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. राजेंद्र यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

Tags : sangli, sangli news, Walekhindi, Child death, snake bites, Father condition serious,