Thu, Sep 20, 2018 19:57



होमपेज › Sangli › छेडछाडीतून हल्ला: आणखी तिघांना अटक

छेडछाडीतून हल्ला: आणखी तिघांना अटक

Published On: Jan 31 2018 2:06AM | Last Updated: Jan 30 2018 11:25PM



सांगलीः प्रतिनिधी

येथील  कोल्हापूर रस्त्यावरील भारतनगर येथे मुलीच्या छेडछाडीवरून चौघांवर 17 जणांनी जोरदार हल्ला केला   होता.  या प्रकरणी मंगळवारी आणखी तिघांना अटक करण्यात आली. साहिल मुजावर शिकलगार (वय 22), सचिन संजय शिकलगार (वय25) दीपक शिद्धाप्पा अदगल (वय 19, रा. सर्व भारतनगर) यांचा त्यात समावेश आहे. दरम्यान, सोमवारी अटक केलेल्या पाच आणि आज अटक केलेल्या सर्वांना पाच फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. 

संशयित हा   एका मुलीची सातत्याने छेड काढत होता. याबाबत तिने तक्रार केली होती. याप्रकरणी जखमींनी रविवारी रात्री सातच्या सुमारास संशयितांना  ‘ मुलीची छेड का काढता’, असा जाब विचारला होता.  त्यानंतर संशयितांनी आणखी काही मित्रांना बोलावून घेतले.  

सर्व संशयितांनी मिळून गौरव विलास गायकवाड, सुधीर पांडुरंग सावंत, केतन किशोर गायकवाड, गणेश भगवान तोडसकर या चौघांनाही लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने जोरदार मारहाण केली.  चौघेही गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात  उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. 

दरम्यान, पोलिसांनी सोमवारी 17 जणांविरोधात मारहाण, विनयभंग, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) नुसार गुन्हा दाखल केला. त्यातील   करण लक्ष्मण शिकलगार,  किशोर कासीम शिकलगार,  राम दत्ता कोळी, हुजेफ हसन पन्हाळकर, चिंतामणी कृष्णा शिकलगार यांना अटक करण्यात आली आहे.  एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आले आहे. आज आणखी तिघांना अटक करण्यात आली. या सर्वांना न्यायालयासमोर हजर केल्यानंतर पाच तारखेपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.