Thu, Apr 25, 2019 07:27होमपेज › Sangli › कृषी महोत्सवाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

कृषी महोत्सवाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Published On: Feb 13 2018 2:00AM | Last Updated: Feb 13 2018 12:04AMइस्लामपूर : शहर वार्ताहर

सांगली जिल्हा कृषि महोत्सव आणि दख्खन जत्रेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी झाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी महोत्सवातील अनेक स्टॉलना भेटी देवून शेतकर्‍यांकडून माहिती घेतली.

सांगली जिल्ह्याचा कृषी महोत्सव रविवारपासून इस्लामपूर येथे सुरू झाला. याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री सुभाष देशमुख, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंढे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते. या महोत्सवात 200 पेक्षा जास्त स्टॉल असून दख्खन यात्रेत 100 स्टॉल आहेत. हा महोत्सव 15 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.

गेली महिनाभर येथील पोलिस  कवायत मैदानावर कृषि महोत्सवाची तयारी सुरू होती. या मैदानावर कृषि संबंधित स्टॉल लागले आहेत. तर दख्खन जत्रेमध्ये स्वयंसहाय्यता महिला बचत गटांच्या वस्तूंचे विक्री व प्रदर्शनाचे स्टॉल मांडले आहेत. यामध्ये बचत गटांनी तयार केलेल्या बस्तू, कपडे, खाद्यपदार्थ आदी विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.

कृषी महोत्सवात सरकारी दालनही आहे. या दालनात शासनाच्या योजनांची माहिती देण्यात येत आहे. तसेच कृषी विषयी पुस्तके, कृषि साहित्य, सुधारित वाणाचे बियाणे, आधुनिक मशागतीची औजारे, उत्कृष्ट शेतीमाल आदीचे स्टॉल आहेत.   कोकण, विदर्भ,   येथील खाद्यसंस्कृतीचा आस्वादही यावेळी घेता येणार आहे.  सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील,  मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, विभागीय संचालक महावीर जंगटे यांन  संयोजन केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार केला.