होमपेज › Sangli › मुख्यमंत्री फडणवीस यांचा आज जत तालुक्यात दौरा 

मुख्यमंत्री फडणवीस यांचा आज जत तालुक्यात दौरा 

Published On: May 18 2018 1:19AM | Last Updated: May 17 2018 11:27PMयेळवी : वार्ताहर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी जत तालुक्याच्या दौर्‍यावर येत आहेत. या दौर्‍याकडे दुष्काळी जनतेच्या नजरा लागून राहिल्या आहेत. मुख्यमंत्री आवंढी येथे सकाळी नऊ वाजता येतील. या दौर्‍यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली.

आवंढी व बागलवाडी येथे सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सुरू असलेल्या कामाची पाहणी ते करणार आहेत. श्रमदान मोहिमेत देखील सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले. बागलवाडी येथील पाणी फौंडेशनच्या कामाची पाहणी  करणार आहेत. ही माहिती आमदार विलासराव जगताप यांनी दिली.    

शेगाव येथील आवंढी रस्त्यावर हेलीपॅडची व्यवस्था केली आहे.  तेथून ते आवंढी येथे  जाणार आहेत. या दौर्‍यासाठी  मोठा पोलिस फौजफाटा तैनात केला आहे. पालकमंत्री सुभाष देशमुख, आमदार जगताप, पंचायत समिती सभापती मंगल जमदाडे, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत उपस्थित राहणार आहेत.