Sun, Feb 24, 2019 05:22होमपेज › Sangli › विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे : मुख्यमंत्री फडणवीस

विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे : मुख्यमंत्री फडणवीस

Published On: Feb 14 2018 1:55AM | Last Updated: Feb 13 2018 11:39PMइस्लामपूर : शहर वार्ताहर

आगामी विधानसभा निवडणुकीत परिवर्तनाच्यादृष्टीने कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असा कानमंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे भाजप कार्यकर्त्यांना दिला. भाजपचे तालुकाध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या निवासस्थानी भाजप कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. तालुकाध्यक्ष प्रसाद पाटील यांनी स्वागत केले. ना. चंद्रकांत पाटील,  ना. पंकजा मुंडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, नगराध्यक्ष निशिकांत पाटील उपस्थित होते. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, वाळवा तालुक्यासह जिल्ह्यातील विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही. राज्य व केंद्राच्या विविध योजनांची माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत  पोहोचवून त्याला विविध योजनांचा लाभार्थी बनवा. आपले शासन सर्व स्तरातील घटकांच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत.  भाजप पक्ष प्रवेश केलेल्या पदाधिकार्‍यांचा सत्कार मुख्यमंत्र्यांनी केला. यावेळी तालुका सरचिटणीस धनंजय रसाळ, धैर्यशील मोरे, जगन्नाथ मोरे, यदुराज थोरात, संग्रामसिंह पाटील, भास्कर कदम, चंद्रशेखर तांदळे, लव्हाजी देशमुख, अजितराव थोरात, अभिजित पाटील आदी उपस्थित होते.