Sat, Apr 20, 2019 08:19होमपेज › Sangli › आयुष महाजन, श्रीराज भोसले विजेते

आयुष महाजन, श्रीराज भोसले विजेते

Published On: May 14 2018 1:40AM | Last Updated: May 13 2018 10:14PMसांगली : प्रतिनिधी

नूतन  बुध्दिबळ मंडळ, सांगली आयोजित  कै. आबासाहेब गानू  स्मृती 12 वर्षाखालील बुध्दिबळ  स्पर्धेच्या सातव्या फेरीत कोल्हापूरच्या आयुष महाजनने जयसिंगपूरच्या दिशा पाटीलचा पराभव करून कै. डॉ. देबसिकदार फिरती रौप्यढाल पटकाविली. सोमवार (दि. 14) पासून कै.श्रीमंत बाळासाहेब लागू  स्मृती रॅपिड्  बुध्दिबळ स्पर्धेला प्रारंभ होत आहे.सांगलीचा हदीन महात व  व जतची श्रीया हिप्परगी यांच्यातील डावाची सुरुवात राजाच्या प्याद्याने झाली. हदीनने रचलेल्या चालींना प्रत्युत्तर देण्यात अपयशी ठरलेल्या श्रीयाचा 32 व्या चालीला पराभव करून उपविजेतेपद पटकाविले.

सातारचा यश पंढरपुरे व नाशिकचा क्रिश चोपडा यांच्यातील डावाची सुरुवात राजाच्या प्याद्याने झाली. यशने रचलेल्या चालीना प्रत्युत्तर देण्यात अपयशी ठरलेल्या क्रिशचा पराभव केला.सांगलीची ईश्वरी जगदाळे व रत्नागिरीचा चिन्मय होमकर यांच्यातील डाव बरोबरीत सोडवून अर्ध्या गुणासह चिन्मयने 5 गुणासह आठवे स्थान पटकाविले.जयसिंगपूरची दिव्या पाटील हिने मिरजेचा विश्वेन फुलारीचा पराभव करून पाचवे स्थान पटकावले.  सांगलीचा हर्ष शेट्टी व पुण्याची प्रेरणा पाटे यांच्यातील डावात प्रेरणाने हर्षचा पराभव करून सहावे स्थान पटकाविले. लातूरचा प्रथमेश देशमुख व सांगलीचा सुधांशू भीमनाथ यांच्यातील डावात सुधांशूने प्रथमेशचा पराभव करून सुधांशूने  दहावे स्थान पटकाविले. मुंबईचा सुमित थिटे व कोल्हापूरचा वेदान्त दिवाण यांच्यातील डावात सुमितने वेदांतचा पराभव करून नववे स्थान पटकाविले.

रेंदाळचा श्रीराज भोसले विजयी

कै. काकासाहेब टिकेकर स्मृती 25 वर्षाखालील बुध्दिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीत रेंदाळचा श्रीराज भोसले व नाशिकचा हर्षल वलाडेनी डाव बरोबरीत सोडवून अर्ध्या गुणासह आघाडी घेतली. अर्ध्या गुणासह श्रीराजने कै. आर.,जी. भिडे - देशमुख फिरता रौप्यकरंडक पटकाविला.