होमपेज › Sangli › छत्रपती संभाजीराजे यांना सांगलीत अभिवादन 

छत्रपती संभाजीराजे यांना सांगलीत अभिवादन 

Published On: May 15 2018 1:34AM | Last Updated: May 15 2018 1:34AMसांगली : प्रतिनिधी

छत्रपती संभाजीराजे यांना जयंतीनिमित्त सांगलीत विविध मराठा संघटनांच्यावतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी संभाजी महाराज यांचा खरा इतिहास समाजासमोर येण्यासाठी जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. सेवा संघाच्या कार्यालयातील संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करुन त्यांच्या कार्याचे स्मरण केले. या वेळी अनेक मान्यवरांनी संभाजी राजे बुध्दिप्रामाण्यवादी होते. एकाच वेळीस त्यांनी मोगल, आदिलशाही, इंग्रज, सिध्दी आणि ब्राह्मण शत्रुंशी लढा दिला.  त्यांनी विषमतेविरुध्द उघड भूमिका घेतल्याने त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न झाला. 

शेवटच्या क्षणापर्यंत समतेसाठी, स्वराज्यासाठी लढणार्‍या महापराक्रमी, महाबुध्दिमान राजाचे कार्य अतुलनीय आहे. त्यांच्याविषयी पसरविला जात असलेला खोटा इतिहास बर्‍यापैकी खोडून निघाला आहे.  पण अजूनही काहीजण प्रयत्न करीत आहेत. त्यांचे हे प्रयत्न हाणून पाडले जाण्यासाठी सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व इतर संघटना जिल्हाभर जागृतीचे विविध उपक्रम, व्याख्याने घेणार आहे, असे सेवा संघाच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले.

या वेळी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील,  डॉ. संजय पाटील, संभाजी पोळ, महेश खराडे, संजय देसाई, श्रीरंग पाटील, शाहीर पाटील, प्रशांत पवार, योगेश पाटील, प्रकाश पाटील, राहुल पाटील, अजय देशमुख, राहुल जाधव, तोहिद शेख, लालासाहेब तांबोळी, शाहीन शेख, शंकर पुजारी, शहाजी भोसले, अभिजित भोसले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्यातही विविध ठिकाणी जयंतीनिमित्त कार्यकर्त्यांनी अभिवादन केले.