Wed, May 27, 2020 14:57होमपेज › Sangli › कोंत्यावबोबलादमध्ये चंदन तस्करास अटक

कोंत्यावबोबलादमध्ये चंदन तस्करास अटक

Published On: Feb 02 2018 1:34AM | Last Updated: Feb 01 2018 11:26PMमाडग्याळ : वार्ताहर

कोंत्येवबोबलाद (ता. जत) येथे मोटारसायकलवरून ( के. ए. 43 एच 4033) चंदनाची तस्करी करीत असताना पिंटू कुलाप्पा बजेंत्री (रा. हातरगा, ता. इंडी, जि. विजापूर) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 1 लाख 45 हजाराचे चंदन जप्त करण्यात आले. उमदी पोलिसांनी बुधवारी त्याच्यावर कारवाई  करून अटक केली.

कोंत्यावबोबलाद गावच्या हद्दीत उमदी ते विजयपूर रस्त्यालगत माळी वस्ती येथे चंदनाची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. उमदी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भगवान शिंदे यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक प्रवीण संपाग, पोलिस नाईक सचिन आटपाडकर, पोलिस श्रीशैल वळसंग यांच्या पथकाने बजेंत्रीला मोटारसायकलवरून पळून जाताना पाठलाग करून पकडले. 

त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 50 किलो चंदन सापडले. चंदनाचे लहान- लहान तुकडे करून तो मोटारसायकलवरून चंदनाची तस्करी करीत  होता. याची किंमत अंदाजे एक लाख पंच्चेचाळीस हजार रूपये आहे. अधिक तपास सचिन आटपाडकर हे करीत आहेत.