Sat, Apr 20, 2019 18:27होमपेज › Sangli › महापौरांच्या उमेदवारीला उच्च न्यायालयात आव्हान : सोमवारी  सुनावणी

महापौरांच्या उमेदवारीला उच्च न्यायालयात आव्हान : सोमवारी  सुनावणी

Published On: Jul 14 2018 12:56AM | Last Updated: Jul 13 2018 11:33PMसांगलीः प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीत प्रभाग 16 मधील काँग्रेसचे उमेदवार महापौर हारुण शिकलगार यांच्याविरोधात तिसर्‍या अपत्याबद्दल शुक्रवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली. याबाबत सोमवारी सुनावणी होणार आहे. 

तक्रारदार आसिफ बावा यांनी गुरुवारी अर्ज छाननीदरम्यान निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे तक्रार केली होती. ती फेटाळत शिकलगार यांचा अर्ज वैध ठरविला होता. त्यामुळे श्री. बावा यांच्यावतीने अ‍ॅड. वसिम समलेवाले यांनी ही याचिका दाखल केली. 

श्री. बावा म्हणाले,   महापालिकेच्या प्रभाग 16 मध्ये महापौर शिकलगार यांना काँग्रेसने पुन्हा उमेदवारी दिली आहे. गुरुवारी अर्ज छाननीवेळी शिकलगार यांच्या अर्जाला मी आक्षेप घेतला होता. शिकलगार यांना 2008 मध्ये तिसरे अपत्य झाल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तुषार ठोंबरे यांनी आमची तक्रार फेटाळत महापौरांचा अर्ज वैध ठरविला आहे. तो निर्णय चुकीचा होता. त्यामुळे मी न्यायालयात धाव घेतली आहे.