Sat, Nov 17, 2018 05:54होमपेज › Sangli › सातव्या मजल्यावरून पडून सेंट्रिंग कामगार ठार

सातव्या मजल्यावरून पडून सेंट्रिंग कामगार ठार

Published On: Jan 05 2018 1:25AM | Last Updated: Jan 05 2018 12:30AM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

शहरातील मंगळवार बाजार परिसरात सुरू असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये काम करीत असताना सातव्या मजल्यावरून पडून शब्बीर नूरमहम्मद शेख (वय 37, रा. चांदणी चौक, सांगली) हा सेंट्रिंग कामगार ठार झाला. गुरुवारी दुपारी ही घटना घडली. याबाबत संजयनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

शब्बीर आज सकाळी नऊच्या सुमारास कामाच्या ठिकाणी गेला होता. दुपारी पावणेदोनच्या सुमारास काम करीत असताना त्याचा तोल जाऊन तो खाली कोसळला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अतिरक्‍तस्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. बांधकाम करीत असताना सुरक्षेची पूर्ण काळजी न घेतल्याने या बांधकामाच्या ठेकेदारावर मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असे पोलिस निरीक्षक रमेश भिंगारदेवे यांनी सांगितले.