Tue, Feb 19, 2019 13:00होमपेज › Sangli › औदुंबर येथे दत्त जयंती उत्साहात साजरी 

औदुंबर येथे दत्त जयंती उत्साहात साजरी 

Published On: Dec 04 2017 1:35AM | Last Updated: Dec 04 2017 1:35AM

बुकमार्क करा

भिलवडी : प्रतिनिधी

पलूस तालुक्यातील श्री क्षेत्र औदुंबर येथे दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. हजारो भाविंकांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांने भक्‍तिमय वातावरणात मुख्य दिवस पार पडला. सायंकाळी पाच वाजता जन्मकाळ व रात्री साडेनऊ वाजता पालखी मिरवणुकीचा आनंद दत्त भक्‍तांनी घेतला. पहाटे पाच पासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. 

काकड आरती, मंगल आरती, अभिषेक, महापूजा, नैवेद्य, महाआरती, कीर्तन, धूप आरती, मंत्रपुष्प, करुणात्रिपदी, महाप्रसाद असे कार्यक्रम यावेळी पार पडले. दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचा भक्‍तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.