Tue, Jul 16, 2019 02:00होमपेज › Sangli › सांगलीत शिवजयंती उत्साहात साजरी

सांगलीत शिवजयंती उत्साहात साजरी

Published On: Apr 18 2018 12:53AM | Last Updated: Apr 17 2018 9:00PMसांगली : प्रतिनिधी

शहरात विविध संघटनांच्यावतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. खणभाग, नळभाग, गावभाग आदी परिसरात ठिकठिकाणी भगवे ध्वज फडकविण्यात आले होते. मनसेच्यावतीने राजवाडा चौकात  शिवोत्सवासही उत्साहात प्रारंभ झाला.

येथील राजवाडा चौकात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जयंती साजरी करण्यात आली. उद्योजक सतीश मालू  व जिल्हा पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या हस्ते शिवाजी महाराज प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी माजी आमदार नितीन शिंदे, अ‍ॅड. स्वाती शिंदे, समित कदम, अमर पडळकर, आदित्य पटवर्धन, निखील जगताप आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. 

मनसेच्यावतीने पाच दिवस विविध कायक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये गोरगरीब मुलांना वह्या वाटप, मराठी रत्न पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. स्टेशन चौकात हिंदू एकता आंदोलनाच्यावतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. नितीन शिंदे यांनी प्रतिमा पूजन केले. यावेळी संस्थापक नारायणराव कदम, पंडितराव बोराडे, विजय कडणे, अशोक पाटील आदी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते

Tags : Celebrated ,festival Shivjayanti sangli news