Sun, Feb 17, 2019 03:12होमपेज › Sangli › इस्लामपुरात केक, चॉकलेटस् मेकिंगचे शुक्रवारी वर्कशॉप

इस्लामपुरात केक, चॉकलेटस् मेकिंगचे शुक्रवारी वर्कशॉप

Published On: Dec 20 2017 1:43AM | Last Updated: Dec 19 2017 10:40PM

बुकमार्क करा

इस्लामपूर : प्रतिनिधी

नाताळच्या सणाचे चॉकलेट व केकशी असणारे नाते अनोखे आहे. नाताळच्या निमित्ताने प्रियजणांना भेटवस्तू देण्यासाठी ड्रायफूडस्, मिठाईबरोबरच विविध केक तसेच आकर्षक पॅकिंग केलेले चॉकलेटस्चीसुद्धा मागणी वाढलेली आहे. यासाठी दै. ‘पुढारी’च्या कस्तुरी क्‍लबच्या माध्यमातून सभासदांसाठी केक, चॉकलेटस् मेकिंंग वर्कशॉपचे आयोजन केले आहे. येथील ड्रीम्स क्‍लासेसच्या संचालिका तेजस्विनी शहा प्रशिक्षण देणार आहेत. 

हे वर्कशॉप येथील कुसुमताई कन्या महाविद्यालयाच्या हॉलमध्ये दि. 22 रोजी दुपारी 1 ते 4 या वेळेत होणार आहे. तरी महिलांनी या वर्कशॉपचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. या वर्कशॉपमध्ये विविध प्रकारचे केक व चॉकलेटस् महिलांना घरच्या घरी करता यावेत. मायक्रो वेव्हशिवाय गॅसवर घरच्या घरी केक बनवायला प्रात्यक्षिकाद्वारे शिकविले जाणार आहे. यामध्ये ड्रायफूड, विना ओव्हन आईस केक, व्हीप क्रीम मेकिंग, कप केक, मफीन्स, डॉल केक तसेच चॉकलेटमध्ये ख्रिसमस कॅडबरी, सांताक्‍लाँझ चॉकलेटस्, बटर स्कॉच, चोकोज् डेअरी मिल्क आदी प्रकार घरच्या घरी बनवायला शिकविण्यात येणार आहेत. केक व चॉकलेटच्या माहितीचे नोटस् प्रत्येक सभासदांना मिळणार आहेत. 

तसेच कस्तुरी सभासद नसलेल्या महिलांसाठी 200 रुपये शुल्क भरावे लागणार आहेत. कार्यक्रमाच्या ठिकाणी कस्तुरी क्‍लबची सभासद नोंदणी होणार आहे. अधिक माहितीसाठी मंगल देसावळे- 8830604322 तसेच 02342-222333 वर संपर्क साधावा.