Sun, Jul 21, 2019 12:04होमपेज › Sangli › सांगलीत चालती कार पेटली

सांगलीत चालती कार पेटली

Published On: May 22 2018 10:32PM | Last Updated: May 22 2018 10:32PMसांगली : प्रतिनिधी

सांगली-कोल्हापूर रस्त्यावर आकाशवाणीजवळ एका चालत्या कारने अचानक पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखत कार रस्त्याकडेला उभी करून आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. 

कोल्हापूरहून एक कार (एमएच 09 बीएक्स 6387) सांगलीकडे येत होती. दुपारी साडेतीनच्या सुमारास कार आकाशवाणीजवळ आल्यानंतर कारच्या पुढील भागाने अचानक पेट घेतला. बॉनेटमधून आगीच्या ज्वाळा बाहेर पडत असल्याचे पाहून चालकाने प्रसंगावधान राखत कार रस्त्याकडेला उभी केली. कारने पेट घेतल्याचे पाहून आजूबाजूचे नागरिक घटनास्थळी जमा झाले.  नागरिकांनी पाणी तसेच आझ विझवण्याच्या यंत्राद्वारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आणली. यावेळी कारमध्ये चालकासह फक्त दोघेच होते. तेही कारमधून बाहेर पडल्याने अनर्थ टळला. यामध्ये कारच्या इंजिनवरील बाजूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेची रात्री उशीरापर्यंत सांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली नव्हती.