Tue, Jul 16, 2019 02:01होमपेज › Sangli › महा-ई-सेवा केंद्रात लाच; पती-पत्नीला अटक 

महा-ई-सेवा केंद्रात लाच; पती-पत्नीला अटक 

Published On: Jan 03 2018 1:17AM | Last Updated: Jan 02 2018 11:34PM

बुकमार्क करा
आष्टा : प्रतिनिधी

शिगाव (ता. वाळवा) येथील महा-ई-सेवा केंद्रात उत्पन्‍नाचा दाखला, डोमेसाईल सर्टिफिकेट व पॅनकार्ड काढण्यासाठी सहाशे रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी  सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी केंद्रचालक पती - पत्नीला मंगळवारी  अटक केली. आष्टा पोलिस ठाण्यात रात्री उशिरा या घटनेची नोंद झाली आहे. राजेंद्र शिवाजी पवार (वय 36) व अर्चना राजेंद्र पवार (33, दोघेही रा. शिगाव, ता. वाळवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

तक्रारदारांनी महा-ई-सेवा केंद्राकडे उत्पन्‍नाचा दाखला, डोमेसाईल सर्टिफिकेट व पॅनकार्ड काढण्यासाठी अर्ज दाखल केला होता. ही कागदपत्रे काढून देण्यासाठी केंद्रचालक राजेंद्र व अर्चना पवार यांनी तक्रारदाराकडे सहाशे रुपयांची मागणी केली होती.तक्रारदारांनी सोमवारी याबाबत सांगली येथील लाचलुचपत प्रतिबंधक  विभागाच्या कार्यालयाकडे तक्रार दाखल केली होती.  तक्रारीची  खातरजमा करून या कार्यालयाने शिगाव येथील या महा-ई-सेवा केंद्रात सापळा रचून दुपारी तक्रारदाराकडून सहाशे रुपयांची लाच घेताना दोघांना अटक केली.