Tue, Jul 23, 2019 17:02होमपेज › Sangli › ब्रह्मनाळ, खटाव, नांद्रेत वाळूचा बेकायदा उपसा

ब्रह्मनाळ, खटाव, नांद्रेत वाळूचा बेकायदा उपसा

Published On: Jun 13 2018 1:35AM | Last Updated: Jun 12 2018 8:32PMभिलवडी : प्रतिनिधी

पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळ व खटावमध्ये  वाळूचा बेकायदा बेसुमार उपसा सुरू आहे. याकडे महसूलचे दुर्लक्ष होत आहे. जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी याठिकाणी छापे  टाकून कारवाई करण्याची मागणी होत आहे.जिल्हाधिकारी यांनी कडक धोरण घेत वाळू माफियांची नाकेबंदी केली आहे. यामुळे वाळू टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे वाळूचा दर गगनाला भिडला आहे.  परिणामी काही ठिकाणी चोरटा वाळू उपसा सुरू झाला आहे. पलूस तालुक्यातील नांद्रे व वसगडे येथे कृष्णा व येरळा नदीचा संगम असल्याने हा परिसर वाळूचे आगार आहे. त्यामुळे याठिकाणी चोरुन वाळू उपसा सुरू आहे.  नांद्रे, वसगडे, खटाव, ब्रम्हनाळ  या ठिकाणी रात्रीच्यावेळी मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात आहे.

ब्रम्हनाळमध्ये रात्री सुरू असणारा उपसा आता सायंकाळी पाच वाजताही होत आहे. बैलगाडी, डंपर, ट्रॅक्टरद्वारे दररोज आठ ते दहा खेपा काढल्या जात आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. केवळ जुजबी कारवाई करुन महसूलमधील काही कर्मचारी जिल्हा प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करीत आहेत. यामुळे वाळू माफिया शिरजोर बनले आहेत. त्यांना धाक राहिला नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी पाटील यांनी याठिकाणी धाड टाकून कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा  इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.