जत : खडनाळ येथे मतदानावर टाकला बहिष्कार 

Last Updated: Oct 21 2019 7:39PM
Responsive image
खंडनाळ (ता. जत) येथील दोन्ही मतदान केंद्रावर शुकशुकाट 

Responsive image

जत :शहर प्रतिनिधी

खंडनाळ (ता.जत) येथील दोन्ही मतदान केंद्रावर दुपारी दोन वाजेपर्यंत शुकशुकाट होता. म्हैसाळच्या पाण्यापासून हे गाव वंचित असल्याने मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. याठिकाणी एकूण मतदारापैकी १४८ मतदारांनी फक्त मतदानाचा हक्क बजावला.

खंडनाळ येथे एकूण मतदार संख्या १६१० इतकी असून दोन मतदान केंद्र आहेत. गेली अनेक वर्षे म्हैसाळचे पाणी मिळावे म्हणून आंदोलन, उपोषणचा मार्ग ग्रामस्थांनी अवलंबूनही शासनाने कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत. विधानसभा निवडणुक काळात पाणी मिळावे म्हणून बहिष्कार टाकण्यासाठी ८०% ग्रामस्थांनी एकमत केले. येथील ग्रामदैवत महालिंगराया मंदिरात सर्वांसमक्ष मतदान करणार नाही अशी भूमिका (शपथ) घेतली होती. 

सकाळपासून मतदार दोन्हीही बूथकडे फिरकले नाहीत. अपवाद काही बोटावर मोजण्या इतक्या मतदारांनी मतदानाची भूमिका बजावली. शिवसेनेचे तम्मा कुलाळ आणि शेतकरी संघटनेचे राजू पुजारी हे आपल्या निर्णयावर ठामपणे राहिले. यामुळे कोणताही मार्ग निघू शकला नाही. यामुळे मतदानास अत्यल्प प्रतिसाद मिळाला. तसेच या ठिकाणी मतदारावर कोणताही दबाव आणू नये म्हणून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.