Wed, May 22, 2019 21:13होमपेज › Sangli › बेडग येथील पाटील कुटुंबांवर नऊ वर्षांपासून बहिष्कार

बेडग येथील पाटील कुटुंबांवर नऊ वर्षांपासून बहिष्कार

Published On: Dec 26 2017 1:34AM | Last Updated: Dec 25 2017 11:04PM

बुकमार्क करा

मिरज : प्रतिनिधी

बेडग (ता. मिरज) येथे जमीन वादातून गेल्या 9 वर्षांपासून सतिश बबन पाटील यांच्यावर गावातीलच सात ते आठजणांनी सामाजिक बहिष्कार टाकला असल्याची घटना उघडकीस आली आहे. सतिश पाटील यांनी मिरज ग्रामीण पोलिसांकडे काही दिवसांपूर्वी तक्रार अर्ज दिला आहे. या अर्जामध्ये काहींनी विकत मागितलेली जमीन दिली नाही, म्हणून संबंधित राजकीय व्यक्‍तींच्या दबावाखाली आपल्यावर बहिष्कार घातला असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. तसेच सामाजीक बहिष्काराबाबतचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गेल्या 9 वर्षांपासून सुरू असलेल्या बहिष्काराबाबत बेडग व परिसरातील गावांत चर्चा सुरू झाली आहे.

तक्रार अर्जावरून सतिश पाटील यांना रितसर तक्रार नोंद करण्यासाठी बोलाविण्यात आले होते. परंतु त्यांनी तक्रार अर्जाशिवाय संबंधीतांविरुद्ध तक्रार नोंदविलेली नाही. तथापि, अर्जातील व्यक्‍तींंना जबाबासाठी बोलविण्यात आले आहे. तक्रारदार व ज्यांच्या विरुद्ध तक्रार आहे, अशा सर्वांच्या जबाबानंतर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे मिरज ग्रामीण पोलिस निरीक्षक मोहन जाधव यांनी सांगितले.