Thu, Jul 18, 2019 10:57होमपेज › Sangli › विदेशी दारूची अवैध वाहतूक करणार्‍या दोघांना अटक

विदेशी दारूची अवैध वाहतूक करणार्‍या दोघांना अटक

Published On: Jun 15 2018 1:06AM | Last Updated: Jun 14 2018 11:46PMइस्लामपूर : शहर वार्ताहर

इस्लामपूर - सांगली रस्त्यावर वाळवा फाट्यानजिक कारमधून  विदेशी दारूची अवैधरित्या  वाहतूक केल्याप्रकरणी  शफीक जलालुद्दीन कुलकर्णी (वय 45), संग्राम सुभाष देसाई (वय 32, दोघेही रा. आष्टा) यांना इस्लामपूर पोलिसांनी अटक केली. ही कारवाई बुधवारी सायंकाळी करण्यात आली.

पोलिसांनी त्यांच्याकडून विदेशी दारूच्या 537 बाटल्या, गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण 3 लाख 11 हजार 887 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.  पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम शेवाळे यांना इस्लामपूर-सांगली रस्त्यावर अवैध दारूची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती मिळाली होती.  त्यानुसार पोलिसांनी वाळवा फाट्यावर वाहनांची तपासणी सुरू केली होती. 

इस्लामपूरकडून सांगलीकडे जात असलेली कार (एम.एच.-10- सीबी-1987)  थांबवून चौकशी केली.  कारची झडती घेतली तेव्हा कारमध्ये विदेशी दारूच्या बाटल्यांचे बॉक्स आढळून आले. संग्राम, शफीक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडील 61 हजार 887 रुपये किंमतीच्या विदेशी दारूच्या बाटल्या पोलिसांनी हस्तगत केल्या.  2 लाख 50 हजार किंमतीची कार पोलिसांनी ताब्यात घेतली.