होमपेज › Sangli › खंडणीप्रकरणी दोघांना अटक

खंडणीप्रकरणी दोघांना अटक

Published On: Apr 18 2018 12:53AM | Last Updated: Apr 17 2018 10:34PMसांगली : प्रतिनिधी

येथील विश्रामबागमधील कॉन्ट्रॅक्टरच्या कार्यालयात घुसून त्याच्यासह त्याच्या मित्रांना कोंडून घालून  बावीस लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. त्यांना तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान या प्रकऱणातील पाच संशयित अद्याप गायबच आहेत. त्यांना लवकरच अटक करू असे पोलिस निरीक्षक प्रताप पोमण यांनी सांगितले. कबीर रहीम  शेख (वय 48, रा. शिंदे मळा, सांगली), संतोष रघुनाथ गुरव (वय 43, रा. विवेकानंद सोसायटी, कुपवाड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणातील किरण कोळगे, सचिन रेणके, अत्तार (पूर्ण नाव नाही), अनोळखी दोघे असे पाच संशयित अद्यापही गायब आहेत.

याप्रकरणी सिव्हील कॉन्ट्रॅक्टर दिलीप सावंत यांनी फिर्याद दिली आहे. शनिवारी सायंकाळी ते त्यांच्या विश्रामबाग येथील कार्यालयात मित्रांसमवेत चर्चा करत बसले होते. रात्री सातच्या सुमारास सर्व संशयित त्यांच्या कार्यालयात आले. त्यानंतर त्यांनी सावंत यांना जमिनीच्या व्यवहारातील पंधरा लाख रूपये आणि आमचे सात लाख रूपये असे एकूण बावीस लाख रूपये द्या अशी मागणी केली. संशयितांनी त्यांना शिवीगाळ करीत दमदाटी केली. त्यानंतर त्यांच्यासह त्यांच्या मित्रांना सुमारे तीन तास कोंडून घालण्यात आले होते. याप्रकरणी मंगळवारी दोघांना अटक करण्यात आली आहे. 
Tags : Both arrested , ransom ,belgaon news