Sat, Mar 23, 2019 01:56होमपेज › Sangli › सांगलीवाडीत भाजपच्या रॅलीला गर्दीचा महापूर

सांगलीवाडीत भाजपच्या रॅलीला गर्दीचा महापूर

Published On: Jul 23 2018 1:11AM | Last Updated: Jul 22 2018 9:01PMसांगली : प्रतिनिधी

सांगलीवाडीत प्रभाग 13 मध्ये रविवारी  (दि. 22) भाजपच्या उमेदवारांच्या प्रचार रॅलीच्या निमित्ताने गर्दीचा महापूर आल्याचा दावा भाजपचे नेते माजी आमदार दिनकरतात्या पाटील यांनी  केला. भाजपचे उमेदवार अजिंक्य दिनकर पाटील, गजानन आलदर व अपर्णा कदम यांच्या प्रचारार्थ सांगली बँक चौकातील श्री राम मंदिरात आ. सुधीर गाडगीळ, दिनकरतात्या पाटील, शेखर इनामदार, भाजप महिला आघाडीच्या नेत्या नीता केळकर यांच्या उपस्थितीत प्रचारप्रारंभ झाला. उपस्थित जनसागर हा भविष्यात भाजपच्या महापालिका विजयाची नांदी असल्याचे आमदार गाडगीळ, दिनकरतात्या पाटील यांनी सांगितले.प्रचारफेरीदरम्यान गल्ली-गल्लीत उमेदवारांचे पंचारतीने स्वागत झाले. साखर वाटून उमेदवारांना शुभेच्छा देण्यात आल्या. दिनकरतात्या पाटील म्हणाले, आम्ही केलेल्या विकासकामांची जनतेला माहिती आहे. त्यामुळे विरोधकांना त्याचा हिशेब देण्याची गरज नाही. 

एकनाथबाबा पाटील, संभाजी आलदर, संजय मोरे, समित कदम, शिवाजीभाऊ पाटील, विलासअप्पा थोरात, शामराव कदम, अ‍ॅड. प्रताप हारुगडे, शंकर पाटील, शरद देशमुख, विष्णू पाटील, अतुल आवळे, गणपतराव मोहिते, धनंजय भिसे, गुंडा मुलाणी, सदाशिव कोळी, भगवान हारुगडे, उदय पाटील, दीपक कांबळे, नाना वाघमोडे, अरुण पाटील, विजय मगदूम, सर्जेराव चव्हाण, संजीवनी पाटील, मीनल पाटील, वैशाली पाटील, सरिता पाटील, माधुरी पाटील, शोभा भोसले, स्वाती नलवडे, माया वळवडे, मल्लम्मा शिवणगे, सुलभ पाटील, आरती चव्हाण, सविता पवार, कांचन चव्हाण, सुषमा यादव, लता  आलदर, नंदा वाघमोडे, संजीवनी पिंजारे, विद्या म्हारगुडे, सारिका  आलदर आदींसह युवक, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोहिते गल्ली, हारुगडे प्लॉट, सोसायटी रोड, नवक्रांती चौक, एकता  चौक, मंगेश्‍वर  चौक, समता  चौक, बाळूमामा मंदिर, त्रिशूल  चौक, विठ्ठल मंदिर, चावडी परिसर अशी रॅली निघाली. संजय मोरे यांनी स्वागत केले. आभार संभाजी आलदर यांनी मानले. ते म्हणाले, दिनकरतात्यांचा सर्वांना आधार आहे. त्यामुळे जनाधार त्यांच्यासोबतच आहे. सांगलीवाडीत भाजपचे उमेदवार निवडून येणार, हे कोणी ज्योतिषाने सांगण्याची गरज नाही.