Fri, Jan 18, 2019 19:17होमपेज › Sangli › ऊस क्षेत्रात मोठी वाढ : तासगाव तालुक्यातील चित्र

ऊस क्षेत्रात मोठी वाढ : तासगाव तालुक्यातील चित्र

Published On: May 14 2018 1:40AM | Last Updated: May 13 2018 7:36PMतासगाव : प्रतिनिधी

चालू हंगामात तासगाव तालुक्यात उसाच्या लागवडीखालील क्षेत्रामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.  तालुका कृषी अधिकारी राजाराम शिंदे यांनी ही माहिती दिली.शिंदे म्हणाले, आरफळ योजनेचे पाणी तालुक्यात सर्वत्र पोहोचल्याने शेतकर्‍यांचा ऊस लागवडीकडे कल वाढला आहे.गेल्या वर्षी तालुक्यात 3  हजार 523  हेक्टर ऊसक्षेत्र होते. चालू हंगामात 4 हजार 676 हेक्टरहून अधिक क्षेत्रावर उसाची लागण झाली आहे. आरफळ योजनेच्या पाण्यावर भरोसा ठेवत या हंगामात लिंब, आळते, शिरगाव, बोरगाव, तुरची, ढवळी, वंजारवाडी,  विसापूर, कवठेएकंद, पुणदी, पेड गावांतील उसाचे क्षेत्र वाढले असल्याचे चित्र आहे.