होमपेज › Sangli › मोटारसायकलच्या धडकेत रायवाडीत शाळकरी मुलगी ठार

मोटारसायकलच्या धडकेत रायवाडीत शाळकरी मुलगी ठार

Published On: Aug 11 2018 1:22AM | Last Updated: Aug 10 2018 11:22PMनागज : वार्ताहर

सायकल आणि मोटारसायकल यांची समोरासमोर धडक होऊन सानिका आकाराम दुधाळ (वय 15, रा. रायवाडी, ता. कवठेमहांकाळ) ही शाळकरी मुलगी ठार झाली. हा अपघात शुक्रवारी सकाळी  रायवाडीजवळ झाला.

सानिका ही नागज  येेथील श्री सिद्धेश्‍वर  माध्यमिक  व  उच्च  माध्यमिक  विद्यालयाची  नववीची विद्यार्थिनी  होती.   सकाळी     नेहमीप्रमाणे ती सायकलवरून नागजला शाळेसाठी निघाली होती.
नागजहून  रायवाडीकडे निघालेले विठ्ठल पितांबर माने यांच्या मोटारसायकल ( एम. एच.03 पी. 5711) ने तिच्या सायकलीला धडक दिली. 

या अपघातात सानिकाच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. तिला सांगली येथील खासगी रूग्णालयात दाखल केले होते.उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.या घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलिस  ठाण्यात झाली आहे. सानिका हिच्या मृत्यूचे वृत समजताच सिद्धेश्‍वर हायस्कूलमध्ये शोककळा पसरली होती.