Tue, Jul 23, 2019 16:43होमपेज › Sangli › माळवाडीसह तीन गावांत आठ दिवस पाणीटंचाई

माळवाडीसह तीन गावांत आठ दिवस पाणीटंचाई

Published On: Jan 06 2018 1:26AM | Last Updated: Jan 05 2018 9:18PM

बुकमार्क करा
भिलवडी ः प्रतिनिधी

माळवाडी, खंडोबाचीवाडी व चोपडेवाडी ही गावे गेल्या आठ दिवसांपासून तहानलेली आहेत. कृष्णा नदी दोन किलोमीटरवर वाहत असूनही पाण्यासाठी ग्रामस्थांचे हाल होत आहेत. माळवाडी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना आठ दिवस बंद आहे. वीज बिल न भरल्याने पुरवठा तोडण्यात आला होता. यामुळे  चार दिवस पाणी सुटले नाही.

नंतरचे चार दिवस जॅकवेल पंप नादुरुस्त झाल्याने पाणी आले नाही. पाणी पुरवठा योजना चालवण्याची जबाबदारी माळवाडी ग्रामपंचायतीची आहे. योजनेचे  चार पंप नादुरुस्त आहेत. तर दुरुस्तीला दिलेला एक पंप गायब झाला आहे. तो परत आणण्याची काहीच हालचाल दिसत नाही. चालू घडीला एक पंप दुरुस्तीला देण्यात आला आहे.

तो दुरुस्त होण्यास आणखी दोन दिवस लागतील. तोपर्यंत तिन्ही गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.
दरम्यान, पंप स्थिती व खर्चाबाबत माळवाडीचे सरपंच बाळकृष्ण जाधव यांनी माहिती दिली.