होमपेज › Sangli › भारतरत्न अटलजींचा अस्थिकलश सांगलीत दाखल (video)

भारतरत्न अटलजींचा अस्थिकलश सांगलीत दाखल (video)

Published On: Aug 23 2018 3:36PM | Last Updated: Aug 23 2018 3:48PMसांगली : प्रतिनिधी

हरिपूर कृष्णा वारणा संगमावर श्रद्धेय अटलजींच्या अस्थी कलशाचे विसर्जन करण्यासाठी  मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष खारावसाहेब पाटील-दानवे यांनी पालकमंत्री सुभाषबापू देशमुख व  सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांना अस्थी कलश सुपूर्द करण्यात आला. 

मुंबईहून गुरुवारी भारतरत्न  अटलजींचा अस्थिकलश सांगलीत आमदार गाडगीळ जनसंपर्क कार्यालयात ठेवण्यात आला.  यावेळी अस्थी कलशाची आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.  यावेळी महापौर संगिता खोत, उपमहापौर धीरज सूर्यवंशी, गटनेते युवराज बावडेकर, माजी आमदार दिनकरतात्या पाटील, शेखर इनामदार, निताताई केळकर, प्रकाश बिरजे, मकरंद देशपांडे, शरद नलवडे, मुन्नाभाई कुरणे, मोहन व्हनखंडे, मोहन वाटवे, विठ्ठल खोत, नगरसेवक गणेश माळी, प्रकाश ढंग, सोनाली सागरे, कल्पना कोळेकर, संजय कुलकर्णी, विनायक सिंहासने, संदीप आवटी, निरंजन आवटी, आनंदा देवमाने, गायत्री कल्लोळी, सुबाव मद्रासी, सविता मदने,  तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

शुक्रवारी सकाळी ९ वाजेपर्यंत अस्थिकलश दर्शनासाठी आमदार सुधीर गाडगीळ यांच्या विश्रामबाग येथील जनसंपर्क कार्यालयात ठेवण्यात येणार आहे. हरिपूर येथील कृष्णा-वारणा पवित्र संगमावर अस्थिकलशाचे विसर्जन करण्यात येणार आहे.  यावेळी जिल्हाचे  खासदार, आमदार, महानगरपालिकेचे महापौर, उपमहापौर व नगरसेवक,  जिल्हापरिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व  सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती व सदस्य, तसेच ग्रामपंचायत सरपंच व सदस्य व पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.