Tue, Nov 20, 2018 21:06



होमपेज › Sangli › सांगली : भारतरत्न अटलजींच्या अस्थींचे हरिपूर येथे विसर्जन (Video)

सांगली : भारतरत्न अटलजींच्या अस्थींचे हरिपूर येथे विसर्जन (Video)

Published On: Aug 24 2018 6:03PM | Last Updated: Aug 24 2018 6:03PM



सांगली :  प्रतिनिधी 

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्थी कलशाचे विसर्जन आज शुक्रवारी  हरिपूर येथील कृष्णा-वारणा नदीच्या संगमावर करण्यात आले. 

सकाळी १० वाजता आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या विश्रामबाग येथील कार्यालयापासून एका सजवलेल्या  वाहनातून अस्थी कलशाची दर्शन यात्रा चालू झाली. विश्रामबाग चौक-जिल्हा मध्यवर्ती बँक-राम मंदिर चौक-स्टेशन चौक-नगर वाचनालय-बालाजी चौक-मारुती चौक-शास्त्री चौक या मार्गावरून हरिपूर पर्यंत ही अस्थी कलश दर्शन यात्रा संपन्न झाली. यावेळी विविध संस्थाचे पदाधिकारी व असंख्य नागरिक बंधू-भगिनींनी पुष्पहार घालून अस्थी कलशाचे दर्शन घेतले. 

या दर्शन यात्रेमध्ये आमदार सुधीरदादा गाडगीळ, आमदार सुरेश खाडे,  जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, निताताई केळकर, मकरंद देशपांडे, दिनकर तात्या पाटील, शेखर इनामदार,  मुन्नाभाई कुरणे, प्रकाश बिरजे,  दिपक शिंदे, राजाराम गरुड, संग्रामसिंह देशमुख, रमेश शेंडगे, महापौर संगीता खोत, उपमहापौर धीरज सूर्यवंशी, गटनेते युवराज बावडेकर व सर्व नवनिर्वाचित नगरसेवक तसेच हरिपूरचे सरपंच विकास हणबर व सर्व ग्रामपंचायत सदस्य अरविंद तांबवेकर, शोभाताई कांबळे, सतिश खंडागळे तसेच युवा मोर्चाचे अजिंक्य हंबर, जयगोंड कोरे, धनेश कातगडे, चेतन माडगुळकर, दरीबा बंडगर, अमोल कणसे, राजीव ताम्हनकर, मोहन वाटवे, मोहन व्हनखंडे   यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.