Tue, Mar 26, 2019 23:55होमपेज › Sangli › नेतान्‍याहू यांनी थोपटली सांगलीकराची पाठ

नेतान्‍याहू यांनी थोपटली सांगलीकराची पाठ

Published On: Jan 19 2018 9:48AM | Last Updated: Jan 19 2018 9:39AMबांबवडे : वार्ताहर  

भारताच्या दौर्‍यावर नुकताच इस्‍त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्‍याहू आणि त्यांची पत्‍नी सारा या महाराष्ट्र दौर्‍यावर आले आहेत. त्‍यांच्या स्‍वागतासाठी खास तुतारी वादन करण्यात आले. नेत्यान्‍याहू यांच्या स्‍वागतासाठी जी तुतारी गगनभेदी ठरली ती तुतारी आहे सांगली जिल्‍ह्यातील तुतारीवादक पांडूरंग गुरव यांची.

सांगली जिल्‍ह्यातील वाटेगाव हे पांडूरंग गुरव यांची गाव. मुंबई विमानतळावर वाटेगावची तुतारी या परदेशी पाहुण्यांसाठी गगनभेदी ठरली आणि सगळ्यांच्या आकर्षणाचीही ठरली.  
यावेळी स्वागत करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'ही महाराष्ट्राची तुतारी' अशी ओळख करून दिली. या तुतारीने परदेशी पाहुणे भारावून गेले व महाराष्ट्राला धन्यवाद दिला. शिवाय तुतारीवादक गुरव आणि साथीदारांची नेत्यान्याहू यांनी दखल घेऊन शाबासकी देत आभारही मानले.

वाटेगावचे पर्यायाने सांगली जिल्ह्याचे नाव गुरव यांनी आपल्या तुतारीच्या कलेने देशासह परदेशातही नेले आहे. त्यांनी शासकीय खर्चाने अमेरिका, मॉरिशस, तर मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचे सोबत जपान दौरा केला आहे.