Thu, Jun 27, 2019 12:35होमपेज › Sangli › कस्तुरी सभासदांसाठी ब्युटी पार्लर वर्कशॉप

कस्तुरी सभासदांसाठी ब्युटी पार्लर वर्कशॉप

Published On: Dec 26 2017 1:34AM | Last Updated: Dec 25 2017 11:10PM

बुकमार्क करा

इस्लामपूर : प्रतिनिधी

दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लबच्यावतीने  दि. 28 डिसेंबर रोजी ब्युटी पार्लर वर्कशॉप हनुमान पतसंस्थेच्या कुसुमताई राजारामबापू पाटील या हॉलमध्ये इस्लामपूर येथे 12 ते 4 घेण्यात येणार आहे. तसेच दि. 29 डिसेंबर रोजी आष्टा येथे  12 ते 4 दत्त मंदिराजवळ लांडे कॉम्प्लेक्स (हॉल) येथे आहे. या हॉलसाठी श्रद्धा लांडे यांचे सहकार्य लाभले आहे.

प्रिया सुहास पाटील (लक्ष्मी ब्युटी कलेक्शन) व अरोमा ट्रेझर कंपनीतज्ञ अनिता पराडकर (मुंबई), हेअर स्पा, पर्सनल केअर (केस, त्वचेसंबंधी माहिती व काळजी) याच्यामध्ये हेअर स्पाचा डेमो करून दाखविला जाईल. तसेच पाच हेअर स्टाईलचे प्रकार व ब्युटी ट्रीटमेंट घेण्यात येणार आहे. तसेच पार्लर वर्कशॉपच्या नोटस् मराठीमधून मिळतील. 

उपस्थित असलेल्या महिलांमधून पाच लकी ड्रॉ काढण्यात येणार आहेत. ज्या महिला कस्तुरी सभासद नाहीत. त्यांना 200 रुपये फी आकारण्यात येईल. त्याची नाव नोंदणी कार्यक्रमाच्या आधी करावी. तसेच कस्तुरी सभासदांची नाव नोंदणी सुरू आहे. कस्तुरी सभासद नोंद झाल्यानंतर लगेचच 6 हजारचे कुपन्स व लिडची नॉनस्टीक कढई देण्यात येईल. वर्षभरामध्ये होणार्‍या कार्यक्रमांमध्ये कस्तुरी मेंबरना सर्व वर्कशॉपमध्ये भाग घेता येईल. 

कस्तुरी क्‍लबची सभासद व्हा व वर्षभरात होणार्‍या कार्यक्रमांचा आनंद घ्या, असे आवाहन दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लबच्या संयोजिका मंगल देसावळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी मंगल देसावळे- 8830604322 तसेच 02342-222333 वर संपर्क साधावा.