Wed, Nov 14, 2018 06:34होमपेज › Sangli › इस्लामपुरातील भामट्याकडून 27 लाख रुपयांचा गंडा?

इस्लामपुरातील भामट्याकडून 27 लाख रुपयांचा गंडा?

Published On: Mar 09 2018 1:36AM | Last Updated: Mar 08 2018 11:42PMसिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

कमी वेळेत व स्वस्तात दुचाकी वाहने देण्याचे आमिष दाखवत सुमारे 27 लाख रुपयांच्या फसवणुकीचा प्रकार एकाने केला. संशयित  शकील रसूल ढलाइत (रा. इस्लामपूर, जि. सांगली) याने पोबारा केला आहे.सिंधुदुर्गसह कोल्हापूर, सांगली, पुणे आदी शहरांतील लोकांना त्याने फसविले आहे. 

या बाबतची तक्रार सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. पोलिसांनी शकील ढलाइत याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून संबंधित संशयित आरोपीचा सिंधुदुर्ग पोलिस कसून शोध घेत आहेत. ढलाइत याने कोल्हापूर, सांगली, पुणे आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधील लोकांना शोरूम मधून कमी वेळेत आणि स्वस्त किंमतीत दुचाकी वाहने घेऊन देण्याचे आमिष दाखवत सुमारे 27 लाख रुपयांवर लोकांची  फसवणूक केली आहे. हा प्रकार  2 फेब्रुवारी 2016 ते 19 एप्रिल 2016 या कालावधीत घडला असून या आमिषाला जिल्ह्यातील बरेचजण बळी पडले आहेत. संबंधित संशयित कुणास आढळून आल्यास जिल्हा पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन आर्थिक गुन्हा शाखेचे पोलिस उपअधीक्षक एन. टी. मोरे  यांनी केले आहे.