Mon, Jun 24, 2019 17:46होमपेज › Sangli › यापुढे सर्वच निवडणुकांत फक्‍त भाजपच

यापुढे सर्वच निवडणुकांत फक्‍त भाजपच

Published On: Aug 08 2018 1:51AM | Last Updated: Aug 08 2018 1:51AMसांगली : प्रतिनिधी

केंद्र आणि राज्यात भाजप सरकार अपयशी ठरल्याच्या वल्गना करणार्‍या विरोधकांना महापालिका निवडणुकीत जनतेने चोख प्रत्तुत्तर दिले आहे. त्या निकालाने आता पुढील सर्वच निकालाची दिशा स्पष्ट झाली आहे. या पुढे प्रत्येक  फक्‍त भाजपच जिंकेल , असा दावा पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व संघटनमंत्री आमदार सुरेश हाळवणकर यांनी केला.

येथील टिळक स्मारक भवनमध्ये जिल्हा कार्यकर्ते, पदाधिकारी बैठकीत ते बोलत होते. महापालिका निवडणुकीत यशाबद्दल शहर जिल्हाध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह सर्वांचा सत्कार करण्यात आला.ग्रामीण जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आमदार सुरेश खाडे, शिवाजीराव नाईक, विलासराव जगताप, माजी आमदार दिनकर पाटील, दिनकर पाटील, भगवानराव साळुंखे, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, मकरंद देशपांडे, शेखर इनामदार, डी. के. पाटील, विक्रम पाटील, प्रकाश बिरजे आदि उपस्थित होते. 

हाळवणकर म्हणाले,  शिवसेनेने 51 जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यांच्या 90 टक्के उमेदवारांची अनामत रक्‍कमही जप्त झाली आहे. ते म्हणाले, यापुढे विरोधक अशाच पद्धतीने समोर येऊन विविध आरोप करीत कांगावा करणार. मित्रपक्षही सोबत असणार नाहीत, हे गृहित धरायला हवे. पण जनता आपल्यासोबत असल्याचे या निवडणुकीने दाखवून दिले आहे. 

ते म्हणाले,सांगलीत मिळालेल्या यशासाठी सांगली, कोल्हापूर, सातार्‍यासह अनेक जिल्ह्यातील कार्यकर्ते राबले. त्यामुळे हे यश सर्वांचेच आहे. आमदार गाडगीळ यांच्या दुकानातील चोख सोन्याप्रमाणे हे चोख यश आता पुढे विकासकामांतून टिकवून ठेवायचे आहे.यापुढे सर्वच निवडणुकांमध्ये शत प्रतिशत भाजपच चालणार, हे उघड आहे. 

हाळवणकर म्हणाले, लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने आता बूथनिहाय मोर्चेबांधणी झाली पाहिजे. आपली ती यंत्रणा तयार असून, राज्यात 90 हजार बूथ सज्ज आहेत. आता नेत्यांनीही पाच-पाच बूथची जबाबदारी स्वीकारून काम करावे. पृथ्वीराज देशमुख यांनी जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा घेत सूचना दिल्या. सूत्रसंचालन सरचिटणीस सुरेंद्र चौगुले यांनी केले.

मराठा, धनगर, लिंगायत आरक्षण डिसेंबरअखेर

हाळवणकर म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीने  70 वर्षांत मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. पूर्वीच्या सरकारमध्ये त्यांनी निव्वळ मंजुरीचे नाटक करून कोर्टात ते टिकू नये अशीच व्यवस्था केली. तेच आता सरकार विरोधात आरक्षणासाठी गळे काढत आहेत. परंतु मराठा समाज सोशिक आहे. त्यांनी अगदी मुंबईत मंत्रालयावरही मोर्चा काढला.  सरकारला बदनाम करण्याचे  काँग्रेस-राष्ट्रवादीने षङ्यंत्रही रचले होते. पण शिस्तबद्ध महामोर्चाने कुठेच तसा प्रकार होऊ दिला नाही. मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीसही मोर्चाला समोर गेले. आता नोव्हेंबरअखेर मराठा आरक्षणाचा निर्णय होईल, डिसेंबर अधिवेशनात धनगर, लिंगायत पोटजातींनाही आरक्षण मिळेल.