Wed, May 22, 2019 22:18होमपेज › Sangli › भाजपने मनपात फसविल्यास वेगळा विचार 

भाजपने मनपात फसविल्यास वेगळा विचार 

Published On: Jul 07 2018 1:37AM | Last Updated: Jul 06 2018 10:35PMसांगली : प्रतिनिधी

सांगली महापालिका निवडणुकीत आरपीआयला 12 जागा देण्याची मागणी आहे. पण याबाबत भाजपकडून वेळकाढूपणा सुरु आहे. भाजपने तातडीने निर्णय द्यावा, अन्यथा पक्ष वेगळा विचार करेल, असा इशारा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिला आहे.

याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात पक्षाचे जिल्हाध्यक्ष महादेव होवाळ, उपाध्यक्ष नानासाहेब वाघमारे, अशोक कांबळे, संजय कांबळे, लालासो वाघमारे, बोधीसत्व माने, प्रवीण धेंडे, विजय बारसिंग, राजेश तिरमारे यांच्यासह कार्यकर्त्यांनी म्हटले आहे की, महापालिका क्षेत्रात मागासवर्गीयांचे सुमारे 60 ते 79 हजार मतदान आहे. प्रत्येक प्रभागात 3 ते 5हजार मतदान आहे. समाजाचे  मतदान पक्षाच्या उमेदवाराला मिळते. त्यामुळेच सध्या पक्षाचे दोन नगरसेवक आहेत. काहीजणांचा काठावर निसटता  पराभव झाला आहे.  भाजप व आरपीआयची युती आहे. पक्षाने 15 दिवसांपुर्वी 12 जागांची मागणी भाजपकडे केली आहे. पण याबाबत भाजपने निर्णय दिलेला नाही.

भाजपचे स्थानिक व वरिष्ठ नेते याकडे दुर्लक्ष करीत आहेत. आरपीआयने याविषयी भाजप नेत्यांना सूचना दिल्या आहेत. उमेदवारी देण्याचा निर्णय भाजपने तातडीने घ्यावा. अन्यथा वेगळा विचार करावा लागेल. याबाबत चर्चा करण्यासाठी पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा रविवार, दि. 8 रोजी घेण्यात येणार आहे. यात पुढील भूमिका ठरविण्यात येणार आहे. वेळ पडल्यास सर्व प्रभागात पक्षाचे उमेदवार उभे केले जातील. पत्रकावर विशाल घोलप, आशिष गाडे, प्रभाकर नाईक, निलेश वाघमारे, सुनील साबळे, शिवाजी वाघमारे, बापू सोनवणे, अमर बनसोडे, प्रदीप आवळे, राजू वरणे यांच्या सह्या आहेत.