Fri, May 24, 2019 06:27होमपेज › Sangli › पंधरा नगरसेवकांचा भाजप प्रवेश चार जूनला : आमदार सुरेश खाडे

पंधरा नगरसेवकांचा भाजप प्रवेश चार जूनला : आमदार सुरेश खाडे

Published On: May 28 2018 1:36AM | Last Updated: May 27 2018 8:35PMमिरज : शहर प्रतिनिधी 

महापालिकेची निवडणूक भारतीय जनता पार्टी ही मोठया ताकतीने लढवणार आहे. भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक सांगलीमध्ये दि. 4 व 5 जून रोजी होत आहे. या बैठकी दरम्यान विद्यमान पंधरा ते सोळा नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी माहिती आमदार सुरेश खाडे यांनी रविवारी दिली. ते म्हणाले, केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचे सत्ता आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात निधी सांगली, मिरज, कुपवाड या  शहरांना   मिळाला  आहे. या शहरांमध्ये सुमारे सात कोटी रुपयांची कामे सध्या सुरू आहेत. मिरजेत प्रभाग क्रमांक दोन, तीन, चार, पाच, सहा, सात व वीस या प्रभागांमध्ये रस्त्यांचे खडीकरण, डांबरीकरण, गटारी, पेव्हिंग ब्लॉक बसविणे, महापालिकेच्या खुल्या जागेत कुंपण भिंत, जॉगिंग ट्रॅक अशी कामे सुरू आहेत. भारतनगर, शांतीनगर सोसायटी, शिवतीर्थ कॉलनी, कमानवेस, दसरा चौक, तानाजी चौक यासह विविध ठिकाणी कामे सुरू आहेत. अजूनही मोठ्या प्रमाणात निधी मिळणार आहे.

ते म्हणाले, काँग्रेस, राष्ट्रवादीसह अन्य पक्षातील आजी-माजी नगरसेवक मोठया प्रमाणात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सुमारे पंधरा ते सोळा  नगरसेवक राज्य कार्यकारिणी बैठकीच्या दरम्यान हे सर्व  भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.  यावेळी मोहन वनखंडे, नगरसेवक सुरेश आवटी उपस्थित होते.