Thu, Apr 25, 2019 17:47होमपेज › Sangli › प्रभाग 15 मध्ये भाजपचे स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार

प्रभाग 15 मध्ये भाजपचे स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार

Published On: Jul 23 2018 1:11AM | Last Updated: Jul 22 2018 8:59PMसांगली : प्रतिनिधी 

प्रभाग 15 मध्ये भाजपचे उमेदवार सौ. सोनल विक्रमसिंह पाटील, रणजीतसिंह संभाजी पाटील, पूजा जितेंद्र मुळे, हाजी मोहम्मदबशीर इब्राहीम बागवान असे स्वच्छ प्रतिमेचे, सुशिक्षित उमेदवार दिले आहेत. त्यांना जनतेतून मोठा पाठिंबा मिळत आहे. येथे खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, डी. के.(काका) पाटील, शेखर इनामदार यांच्यासह शेकडो जणांच्या सहभागाने प्रचाराचा धडाका लावला आहे, असे विक्रमसिंह पाटील सावर्डेकर, रणजितसिंह पाटील सावर्डेकर यांनी सांगितले. 

ते म्हणाले की, पाटील (सावर्डेकर) कुटुंबीय अनेक वर्षांपासून समाजकारणात  सक्रिय आहेत. या कुटुंबातील सर्वांनीच सामान्यांच्या विकासासाठी  काम केले आहे. नगरपालिकेत प्रतिनिधीत्व  करताना प्रभागात विविध विकास कामे केली आहेत. सामान्य जनतेच्या हाकेला या कुटुंबांतील सर्व सदस्य सतत धावून जातात. सावर्डेकर कुटुंबाचा जनतेविषयी असणारा कळवळा व जनसंपर्क ओळखून भाजपने सौ. सोनल  विक्रमसिंह पाटील, रणजीतसिंह संभाजी पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याबरोबरच  पूजा जितेंद्र मुळे, हाजी मोहम्मदबशीर इब्राहीम बागवान  यांनाही  बरोबर घेतले आहे. भाजपचे हे सर्व उमेदवार स्वच्छ प्रतिमेचे, सुशिक्षित आहेत. त्यांच्या प्रचारासाठी खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, डी. के. पाटील, शेखर इनामदार, संभाजी सावर्डेकर  यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांनी सहभाग घेतला. आज  रमामातानगर, गारपीर, गणेशनगर, लोंढे प्लॉट, पत्रकारनगर, पी. आर. पाटील रोड, शंभर फुटी रोड, आंबेडकरनगर येथे प्रचारफेरीस  मोठा प्रतिसाद मिळाला. जनतेतून वाढता पाठिंबा मिळत असल्याने विरोधक खालच्या स्तरावर जाऊन टीका करीत आहेत.

मतदारच त्यांना अजिबात थारा देणार नाहीत, असे विक्रमसिंह सावर्डेकर, रणजीत सावर्डेकर यांनी सांगितले. प्रचारफेरीत संभाजी तांबडे, अशोक फावडे, मोनीन मुजावर, चैवगोंड देशिंगे, विजय रजपूत, सूरज चोपडे, युनूस जमादार, सी.एम. मेहता, विजय गोरे, लहू भडेकर, इलियास शेख, आयुब मुजावर, उमर जहागिरदार, महेंद्र सावंत, बिरेंद्र थोरात, संतोष लोखंडे, अजय लोखंडे, विज्ञान माने, सुनील जाधव, अश्पाक करीम, युसफ शेख यांच्यासह हजारोंच्या संख्येने युवक, महिला सहभागी झाले होते.