Mon, Jul 22, 2019 03:27होमपेज › Sangli › टेंभू योजनेला केंद्राकडून १२८० कोटी : खा. पाटील

टेंभू योजनेला केंद्राकडून १२८० कोटी : खा. पाटील

Published On: Jan 20 2018 1:41AM | Last Updated: Jan 19 2018 8:41PMआटपाडी  ः प्रतिनिधी 

टेंभू योजनेच्या सुधारित प्रशासकीय प्रस्तावास मान्यता मिळाली आहे. यामुळे 1280 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती खासदार संजय पाटील यांनी पत्रकारांना दिली. यावेळी पंचायत समितीचे सभापती हर्षवर्धन देशमुख, समाजकल्याण सभापती ब्रम्हदेव पडळकर, आनंदराव पाटील, भारत पाटील उपस्थित होते. खासदार पाटील म्हणाले, पंतप्रधान सिंचन योजनेतून जलसिंचन योजनांसाठी 8000 कोटींचा निधी दिला जाणार आहे. त्यापैकी 1280 कोटी रुपये टेंभूसाठी दिले जाणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव गेल्या पंधरवड्यात दिला होता. त्यास मंजुरी मिळाल्याने टेंभू योजनेच्या पूर्ततेचा मार्ग मोकळा झाला आहे. 

टेंभूची रखडलेली कामे, भूसंपादन, जमीन अधिग्रहण व विविध कामांसाठी हा निधी उपलब्ध झाला आहे. राजेवाडी तलावात पाणी आणण्यासाठी आणि उरमोडीचे पाणी देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.    समान पाणी वाटप आणि सर्वांना पाणी देण्याचा प्रयत्न आहे.  पाणी योजनांच्या वीज बिलासाठी 81:19 फॅार्म्युला मंजूर झाला आहे. 100टक्के वीज बिल देखभाल दुरुस्तीतून अदा व्हावे यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. तालुक्यातील रखडलेल्या कामांनाही न्याय दिला जाईल, अशी ग्वाहीही खा. पाटील यांनी दिली.