Wed, Jan 23, 2019 15:28होमपेज › Sangli › अवघी आटपाडी अवतरली कॅनव्हॅासवर

अवघी आटपाडी अवतरली कॅनव्हॅासवर

Published On: Sep 07 2018 1:06AM | Last Updated: Sep 06 2018 11:55PMआटपाडी : प्रतिनिधी 

राज्यस्तरीय प्रत्यक्ष निसर्गचित्रण स्पर्धेच्या माध्यमातून अवघी आटपाडी कॅनव्हॅासवर अवतरली होती.आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या विजयादेवी क्रिएटीव्ह ग्रुपने अमरसिंह देशमुख यांच्या पुढाकाराने आयोजित या स्पर्धेला मोठा प्रतिसाद लाभला.593 चित्रकारांनी कला कॅनव्हासवर आणली.

स्पर्धेत सहभागी चित्रकारांना आटपाडी व परिसराची  चित्रे काढायची होती.  विविध चौक, मंदिरे, इमारती, बाजारपेठ आणि अन्य ठिकाणे चित्रकारांनी  रेखाटली.

आटपाडीकरांसाठी हा अनुभव वेगळा होता. म्हसवड येथील ओम कला अविष्कारने जलद आकर्षक रांगोळी काढण्याचे प्रात्यक्षिक सादर केले. सकाळच्या सत्रातील चित्रांचे प्रदर्शन श्री कल्लेश्‍वर मंदिरात झाले. सुधीर पवार, प्रा. गणेश पोतदार, प्राचार्य प्रदीप पाटील या चित्रकारांनी चित्रांचे परीक्षण केले. सुधीर पवार यांनी चित्रकलेबाबत माहिती देत पेंटिंगचे प्रात्यक्षिक सादर केले. निकाल असा ः खुला गट- प्रथम - गजानन शेळके (मुंबई),द्वितीय- संदेश मोरे (पुणे), तृतीय- संदीप कुंभार (इचलकरंजी), चौथा - चैतन्य शिंदे (मिरज).  उत्तेजनार्थ -रईस मकानदार (पुणे), दत्तात्रय मागाडे (सांगली), विनायक मुरीबुवा (मिरज), अवधूत करजगी (सांगली), सोहेल सय्यद (अकलूज), वामन तुळसकर (वेंगुर्ला).

महाविद्यालयीन गटात- मुंबईच्या अक्षय डांगे, कोल्हापूरच्या अनिकेत मुळे, मुंबईच्या ऋषिकेश मुळे यांनी अनुक्रमे यश मिळवले.महिला व मुलींच्या  गटात इचलकरंजीच्या विलेशा कांबळे, सातार्‍याच्या सुचित्रा फडतरे, पुण्याच्या श्रृती रुगे यांनी अनुक्रमे क्रमांक मिळवले.  विजेत्यांना क्रिएटीव्ह ग्रुपचे अध्यक्ष अमरसिंह देशमुख, माजी प्राचार्य डॉ. सुभाष कारंडे, प्राचार्य प्रदीप पाटील यांच्या उपस्थितीत परितोषिके देण्यात आली.