Sun, Mar 24, 2019 08:17होमपेज › Sangli › आटपाडी नगरपंचायत होणार

आटपाडी नगरपंचायत होणार

Published On: Jan 24 2018 1:21AM | Last Updated: Jan 23 2018 11:28PMआटपाडी  ः प्रतिनिधी 

आटपाडी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्यास नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी मंगळवारी हिरवा कंदील दाखवला. याबाबत येत्या 15 दिवसांत अंतिम निर्णय जाहीर केला जाईल. त्यानंतर पुढील कार्यवाही शासन पातळीवर केली जाईल.

तालुकापातळीवरच्या सर्व गावांमध्ये नगरपंचायत किंवा नगरपरिषद करण्याचा निर्णय शासनाने गेल्या वर्षी घेतला. त्यानुसार जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या गावांमध्ये नगरपंचायती अस्तित्वात आल्या; परंतु आटपाडीचा निर्णय मात्र आजपर्यंत झाला नव्हता.

आटपाडी शहराची लोकसंख्या 30 हजार आहे. त्यामुळे येथे नगरपंचायत किंवा नगरपरिषद होण्याची गरज होती. ग्रामपंचायतीचे उत्पन्‍न मर्यादित असल्याने विकासकामांना पुरेसा निधी उपलब्ध होत नाही. आता मंत्रालयात नगरपंचायतीत याबाबत निर्णय झाल्याने संभ्रमावस्था संपली आहे.

ना. पाटील यांच्या उपस्थितीत नगरविकास खात्याचे उपसचिव मोघे, आमदार अनिल बाबर, जिल्हा प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदार सचिन लंगुटे यांच्या उपस्थितीत आटपाडी नगरपंचायतीबाबत बैठक झाली.