Fri, Apr 26, 2019 03:57होमपेज › Sangli › डॉ. कदम यांचा अस्थिकलश आज सांगलीत अंत्यदर्शनास

डॉ. कदम यांचा अस्थिकलश आज सांगलीत अंत्यदर्शनास

Published On: Mar 12 2018 1:07AM | Last Updated: Mar 11 2018 8:30PMसांगली : प्रतिनिधी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांचा अस्थिकलश सोमवारी काँग्रेस कमिटी तसेच स्टेशन चौकात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.  अंत्यदर्शनानंतर सायंकाळी हरिपूर संगमावर अस्थींचे विसर्जन होणार असल्याचे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले. यासंदर्भात नियोजनासाठी रविवारी काँग्रेस कमिटीत बैठक पार पडली. 

 पाटील म्हणाले, डॉ. कदम यांच्या जाण्याने राज्य आणि जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे महापालिका क्षेत्राच्या विकासातही मोठे योगदान होते. त्यांच्या जाण्याने अपरिमित पोकळी निर्माण झाली आहे. 

ते म्हणाले, सोमवारी दुपारी एक  वाजता त्यांचा अस्थिकलश वांगी (ता. कडेगाव) येथून सांगलीला येईल. दुपारी एक ते दोन या कालावधीत हा अस्थिकलश सांगलीत जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी दोन  ते सायंकाळी सहापर्यंत सांगलीत  स्टेशन चौक येथे ठेवण्यात येणार आहे. सायंकाळी हरिपूर संगमावर अस्थीविसर्जन करण्यात येईल. तरी  नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी दर्शनासाठी उपस्थित रहावे.

महापौर हारूण शिकलगार, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष नामदेवराव मोहिते, नगरसेवक राजेश नाईक, नगरसेवक संतोष पाटील, सुभाष खोत, अजित ढोले, बिपीन कदम, दिलीप पाटील, अमित पारेकर उपस्थित होते.