Sat, Nov 17, 2018 03:45होमपेज › Sangli › सांगली, कुपवाडमधील काही मुंबई पोलिसांच्या रडारवर

सांगली, कुपवाडमधील काही मुंबई पोलिसांच्या रडारवर

Published On: Dec 11 2017 1:34AM | Last Updated: Dec 10 2017 11:55PM

बुकमार्क करा

सांगली/कुपवाड : प्रतिनिधी

सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्‍विनी बिंद्रे-गोरे यांच्या बेपत्ता प्रकरणी अटक करण्यात आलेले पोलिस निरीक्षक अभय कुरूंदकर यांनी सांगलीतही अडीच वर्षे काम केले आहे. त्यावेळी त्यांच्याशी जवळीक असणारे सांगलीतील काहीजण व कुपवाडमधील एक व्यापारी मुंबई पोलिसांच्या रडारवर आले आहेत. त्यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी होण्याची शक्यता आहे. 

बिंद्रे बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल झाल्यानंतर कुरूंदकर यांच्याशी सातत्याने संपर्कात असलेल्यांची मुंबई पोलिस चौकशी करीत आहेत. याप्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या भाच्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कुरूंदकर सांगली एलसीबीत कार्यरत असताना त्यांचे सांगलीतील अनेकांशी तसेच कुपवाडमधील एका व्यापार्‍याशी निकटचे संबंध होते.  कुरूंदकर यांना कुपवाडमधील एका व्यापार्‍याने या कालावधीत फोन केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी या व्यापार्‍याच्या  मैत्रीबाबत पोलिसांकडून माहिती घेतली आहे.