Mon, Jun 17, 2019 18:58होमपेज › Sangli › माजी नगरसेवकाच्या चौकशीची शक्यता

माजी नगरसेवकाच्या चौकशीची शक्यता

Published On: Dec 12 2017 2:09AM | Last Updated: Dec 11 2017 11:52PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्‍विनी बिंद्रे-गोरे यांच्या बेपत्ताप्रकरणी अटक करण्यात आलेले पोलिस निरीक्षक अभय कुरूंदकर यांच्याशी संपर्कात असलेल्या कुपवाडमधील त्या व्यापार्‍याचे धाबे दणाणले आहेत. त्याचबरोबर त्या व्यापार्‍याने एका माजी नगरसेवकाचा फ्लॅट स्वतःच्या नावावर करार करून भाडेतत्वावर घेतला होता.  त्यामुळे आता त्या माजी नगरसेवकाचीही चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  

बिंद्रे बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल झाल्यानंतर कुरूंदकर यांच्याशी सातत्याने संपर्कात असलेल्यांची मुंबई पोलिस चौकशी करीत आहेत.  कुरूंदकर सांगली एलसीबीत कार्यरत असताना त्यांचे सांगलीतील अनेकांशी तसेच कुपवाडमधील एका व्यापार्‍याशी निकटचे संबंध होते. 

बिंद्रे बेपत्ता झाल्यानंतर कुरूंदकर यांनी ज्यांच्याशी संपर्क ठेवला होता. त्यांच्याकडे मुंबई पोलिस चौकशी करीत आहेत. कुरूंदकर यांना कुपवाडमधील एका व्यापार्‍याने या कालावधीत फोन केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी या व्यापार्‍याच्या कुरुंदकर यांच्याबरोबरच्या  मैत्री  बाबत सांगली पोलिसांकडून माहिती घेतल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. 

व्यापार्‍याचे खास संबंध

कुरूंदकर सांगलीत असताना त्या व्यापार्‍याशी त्यांचे खास संबंध होते. त्यांची सांगलीतून बदली झाल्यानंतरही तो कुरूंदकर यांच्या संपर्कात होता. ते दोघे तासन् तास फोनवर बोलत असल्याचीही चर्चा आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी त्या व्यापार्‍याच्या कौटुंबिक अडचणीवेळी कुरूंदकर यांनी कुपवाडमध्ये धाव घेतली होती.