Sun, Jul 05, 2020 22:17होमपेज › Sangli › अश्विनी बिंद्रे प्रकरण : कुरूंदकरची नार्को टेस्ट?

अश्विनी बिंद्रे प्रकरण : कुरूंदकरची नार्को टेस्ट?

Published On: Dec 15 2017 2:46AM | Last Updated: Dec 15 2017 2:46AM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

सहायक पोलिस निरीक्षक अश्‍विनी बिंद्रे-गोरे यांच्या बेपत्ता प्रकरणातील संशयित पोलिस निरीक्षक अभय कुरूंदकर याला अटक करण्यात आली आहे. पोलिस कोठडीच्या दरम्यान कुरूंदकर तपासात सहकार्य करत नसल्याने त्याची नार्को टेस्ट करण्याची मागणी न्यायालयात करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

कुरूंदकर सांगलीत कार्यरत असताना तो एकनाथ खडसे यांचा भाचा राजेश पाटील याच्या संपर्कात होता. राजेेशच्या मदतीनेच कुरूंदकरने सांगली एलसीबीचा कार्यभार घेतला होता. त्याशिवाय तो जिल्ह्यातील राजकीय नेत्यांबाबत खडसे यांना माहिती पुरवत असल्याचेही एका पोलिस अधीक्षकांनी महासंचालकांना लिहिलेल्या पत्रावरून स्पष्ट झाले आहे. 

सध्या कुरूंदकर मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्याकडे पोलिस बिंद्रे यांच्याबाबत कसून चौकशी करीत आहेत. मात्र कुरूंदकर त्यांना तपासात अजिबात सहकार्य करीत नाही. त्यामुळे त्याची नार्को टेस्ट करण्याची मागणी पोलिस करणार असल्याचे सांगण्यात आले.

बिंद्रे बेपत्ता झाल्यानंतर कुरूंदकर यांनी ज्यांच्याशी संपर्क ठेवला होता. त्यांच्याकडे मुंबई पोलिस चौकशी करीत आहेत. कुरुंदकर यांच्या संपर्कात असणार्‍यांचे यामुळे धाबे दणाणले आहेत. कुरूंदकर यांना कुपवाड मधील एका व्यापार्‍याने या कालावधीत फोन केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी या व्यापार्‍याच्या  मैत्री  बाबत सांगली पोलिसांकडून माहिती घेतली आहे.