Fri, Jul 19, 2019 07:12होमपेज › Sangli › आष्ट्यात जादा दराने स्टँप विक्रीतून नागरिकांची लूट

आष्ट्यात जादा दराने स्टँप विक्रीतून नागरिकांची लूट

Published On: Dec 23 2017 2:11AM | Last Updated: Dec 23 2017 12:08AM

बुकमार्क करा

आष्टा : प्रतिनिधी

आष्टा दुय्यम निबंधक कार्यालय परिसरात अनधिकृत व विनापरवाना स्टँप  विक्रेत्याकडून जादा दराने स्टँप विक्री करून नागरिकांची मोठ्या प्रमाणात लूट सुरू आहे. संबांधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा नगरसेवक वीर कुदळे यांच्यासह आष्टा व परिसरातील नागरिकांनी दिला आहे. आष्टा दुय्यम निबंधक कार्यालय परिसरात सहा अधिकृत स्टँप व्हेंडर आहेत. या व्यतिरिक्त या परिसरात अन्य 8 ते 10 जणांनी अनधिकृत व विनापरवाना स्टँप विक्रीची दुकाने सुरू केली आहेत.अधिकृत विक्रेत्याकडून स्टँप खरेदी करून त्याची 30 ते 50 रुपये जादा दराने विक्री केली जात आहे.

अधिकृत विक्रेते स्टँप शिल्लक नसल्याचे सांगून परत पाठवितात.परंतु अनधिकृत विक्रेत्याकडे जादा दराने सर्व प्रकारचे स्टँप व कोर्ट फी तिकीटे मिळतात. याशिवाय नागरिकांकडून जादा पैसे घेऊन खरेदी -विक्री, तारण, गहाण, मृत्यूपत्रासह या कार्यालयातील सर्व कामाकाजाचे दस्तऐवज व कागदपत्रे त्यांच्याकडून तयार करून दिली जात आहेत. एक झेरॉक्स 2 रुपये, एक पानाचे टायपिंग तीस रुपये, कोर्ट फी स्टँप 2 रुपये जादा दराने विक्री केली जात आहे. वेळोवेळी तक्रारी करूनही संबंधितांकडून दखल घेतली जात नाही.