Sat, Jul 20, 2019 11:10होमपेज › Sangli › आष्टा अतिरिक्‍त ‘तहसील’चा अध्यादेश जारी : ना. खोत

आष्टा अतिरिक्‍त ‘तहसील’चा अध्यादेश जारी : ना. खोत

Published On: Jun 23 2018 1:22AM | Last Updated: Jun 23 2018 12:21AMइस्लामपूर : वार्ताहर

शासनाने आष्टा येथील अतिरिक्‍त तहसील कार्यालयाचा अध्यादेश शुक्रवारी निघाला असल्याची माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली. या अध्यादेशामुळे आष्टा परिसरातील जनतेला दिलेला शब्द आम्ही पाळला आहे, असेही ते म्हणाले. ते  म्हणाले, माजी आमदार विलासराव शिंदे यांची गेल्या अनेक वर्षांपासून स्वतंत्र आष्टा तालुक्याची मागणी होती. भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इस्लामपूर येथील कार्यक्रमात पहिल्या टप्प्यात आष्टा येथे अतिरिक्‍त तहसील कार्यालय मंजूर करीत असल्याची घोषणा केली होती. त्याची खर्‍या अर्थाने आज पूर्तता झाली आहे. 

मुख्यमंत्री फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले होते. आता शासनाने अध्यादेश जारी केल्याने अतिरिक्‍त तहसील कार्यालय सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या कार्यालयासाठी अप्पर तहसीलदार,  नायब तहसीलदार, अव्वल कारकून यांच्यासह लिपिक, टंकलेखक अशी पदेही शासनाने मंजूर केली आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे आष्टा परिसरातील जनतेची अनेक वर्षांपासूनची मागणी मार्गी लागली असून त्यांची चांगली सोय होणार आहे, असेही ना. खोत  म्हणाले.