Wed, Mar 20, 2019 08:54होमपेज › Sangli › भाजपची घौडदौड रोखणे अशक्य : नाईक 

भाजपची घौडदौड रोखणे अशक्य : नाईक 

Published On: Mar 25 2018 12:36AM | Last Updated: Mar 24 2018 8:33PMइस्लामपूर : वार्ताहर

केंद्र व राज्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपला यश आल्याने विरोधकांमध्ये अस्थिरता व अस्वस्थता निर्माण झाली आहे. आता भाजपची यशस्वी घौडदौड रोखणे अशक्य आहे,   असे प्रतिपादन   जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रणधीर नाईक यांनी   केले. 

येथे तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. माजी आमदार भगवानराव साळुंखे अध्यक्षस्थानी होते. तालुका भाजपचे अध्यक्ष प्रसाद पाटील, सुरेखा मटकरी, संग्रामसिंह पाटील, राजकुमार पाटील, अभिजित पाटील उपस्थित होते.साळुंखे म्हणाले, काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षात विशिष्ट कुटुंबांची मक्‍तेदारी आहे. त्या पक्षांमध्ये नातेवाईक वारसदार यांना संधी दिली जाते. नगराध्यक्ष  निशिकांत पाटील म्हणाले, तालुक्यात सत्ता केंद्रांचा वापर हा बगलबच्चे व नातेवाईकांसाठी केला जात आहे.  

अविचारी नेतृत्वाने तालुक्यातील सर्वसामांन्य जनतेचा सन्मानही केला नाही.  जिल्हा सरचिटणीस वैभव शिंदे, युवा मोर्चाचे उपाध्यक्ष शशिकांत देशमुख, विक्रम शिंदे, चंद्रशेखर तांदळे यांची भाषणे झाली. सरचिटणीस धैर्यशील मोरे यांनी स्वागत केले. 

Tags :