Wed, Jan 23, 2019 08:36होमपेज › Sangli › खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेसाठी पै. अपूर्वा पाटील हिची निवड

खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेसाठी पै. अपूर्वा पाटील हिची निवड

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली :  प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व क्रीडा व युवक सेवा संचनालय (पुणे) यांच्या विद्यमाने आयोजित मुंबई येथे होणार्‍या चौथ्या  (स्व.) खाशाबा जाधव राज्यस्तरीय फ्री व ग्रीकोरोमण कुस्ती मुले व वरिष्ठ महिला फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेसाठी पै. अपूर्वा संभाजी पाटील (पलूस) हिची निवड झाली. नागपूर येथे यासाठी राज्य निवड स्पर्धा झाली होती. अपूर्वा पाटील ही वसंतदादा अभियांत्रिकी महाविद्यालय (बुधगाव) येथे शिकत आहे. उशांत क्रीडा व्यायाम मंडळाच्या कुस्ती केंद्रात आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक राज्य पुरस्कार प्राप्त उत्तमराव पाटील, सुहास पाटील, अनिल बुर्ले  यांच्या मार्गदर्शनाखाली ती सराव करत आहे.  रोहतक येथे झालेल्या अ. भा. आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धेत तसेच अनेक राज्य स्पर्धेत तिने भाग घेतला आहे. या निवडीबद्दल तिचे  कवलापूर ग्रामस्थ व मंडळाचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.

Tags : Sangli, Sangli News, Apurva Jadhav, selected, Khashaba Jadhav, Wrestling, competition


  •